मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

गोरेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर विनोद बागडे यांची बिनविरोध निवड

गोरेगाव (अजय होळकर) : माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायततीत झालेल्या मिटिंगमध्ये ग्रा.पं सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहर अध्यक्ष विनोद बागडे यांची एकमताने गोरेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांनी शुभेच्छा दिल्या. 

तसेच गोरेगांवचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते विकासदादा गायकवाड व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जि.प. गट गोरेगांव विभाग विलास यादव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरेगांव शहर अध्यक्ष सुमित भागवत, शहर उपाध्यक्ष अनिकेत महाडिक व सरपंच जुबेर अब्बासी व माजी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, गोरेगांव ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी‌ यांनीही त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

Comments

Popular posts from this blog