Posts

मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨
Image
Roha’s Daughter Anushka Deshpande’s Spectacular Success in MBBS Examination
Image
First Female Lawyer from the Tribal Community Sapna Waghmare Honored by Minister Aditi Tatkare
Image
Demands for Strict Action Against 'Reliance' PRO Following Molestation of a Woman
Image
खाद्यतेलाच्या नावाखाली डिझेल तस्करी करणाऱ्या आंतरराज्य माफियाचा पर्दाफाश! ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४६.५ लाखांच्या मुद्देमालासह 'राजू पंडित' टोळीचे धागेदोरे उघड ठाणे, दि. ३१ (प्रतिनिधी) :- मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून, या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांना फसवण्यासाठी संबंधित टँकरवर 'ईडीबल ऑईल' असे लिहिण्यात आले होते. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर क्रमांक MH-46-BB-7134 थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणा...
Image
लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :-  ​रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये घडलेल्या एका भीषण आणि खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकार लॉजमधील रूम नंबर ०१ मध्ये अनिस मोहम्मदखान मालदार या ३८ वर्षीय आरोपीने एका महिलेच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर कोयत्याने भीषण वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, ज्याचा शोध घेण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपल्या अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक मजबूत तपास पथक तैनात केले होते. या विशेष मोहिमेत सहाय्यक पोलीस ...
Image
रोह्यात नदीकाठी जैविक कचऱ्याची बेकायदेशीर होळी! नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर रोहा (संदीप सरफळे) :- ​ रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यातून निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी घुसमट झाली आहे. नियमानुसार अशा घातक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे बंधनकारक असताना, अज्ञात घटकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीकाठी हा कचरा पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडबडून जाग आलेल्या नगर परिषदेने तातडीने पावले उचलत स्थानिक भंगार व्यावसायिक आणि नोंदणीकृत रुग्णालयांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करणार आहेत. ​शहरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात असतानाच, थेट नदीकाठी सलाईनच्या बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले का...
Image
रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य रायगड (प्रतिनिधी) :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.  लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्यार्कारता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसो (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्र...