मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

'साठी बुद्धी नाठी?' जे आस्तित्वातच नाही ते पण निजामपूरच्या सरपंचाला दिसू लागलेय 

माणगांव (प्रतिनिधी) : जेव्हा माणसाचे वय वाढत जाते तेव्हा त्याच्या बुद्धीवर विपरीत परिणाम होत असतो असे आपण नेहमीच ऐकत असतो. पण त्याची प्रत्यक्ष प्रचिती निजामपूरच्या सरपंचाच्या अवस्थेतून दिसून आली आहे. 

निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम तुकाराम रणपिसे यांना तर आस्तित्वात नसलेल्या गोष्टी पण दिसू लागल्या आहेत व जे प्रत्यक्ष आस्तित्वात आहे, ते मात्र दिसतच नाही! त्यामुळे वाढत्या वयानुसार त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जर असा सरपंच असेल तर त्या गावाचा विकास होईल, की वाटोळे होईल? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. 

निजामपूर येथील 'न्यूज २४ तास मराठी' चे पत्रकार मंगेश मेस्त्री यांनी निजामपूर सरेकर आळी येथील मिळकतीच्या चतुर्सिमेसंदर्भात ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यावेळी सरपंच राजाराम रणपिसे यांनी स्वतःच्या सही-शिक्क्यासह (जावक क्र. ५२) एक दाखला दिला आहे. त्यामध्ये मिळकतीच्या दक्षिण दिशेला सर्वे नं. ११७/५ मध्ये राजाराम तुकाराम रणपिसे व इतर ४ यांची शेतजमीन असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या जागेवर शेतजमीन नसून वर्षानुवर्षे येथील सिताराम गणपत सुतार व ज्ञानदेव गणपत सुतार यांची घरे आस्तित्वात आहेत. 

परिणामी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येची दखल घेणे गरजेचे बनून राहिले आहे. 



Comments

Popular posts from this blog