ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

साई हायस्कूलच्या चंद्रकांत अधिकारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 

माणगांव (राजन पाटील) : शिक्षणातील अध्ययन व  अध्यापनाच्या यशस्वी निष्पती बरोबर सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 'आदर्श शिक्षक' पुरस्कार दिला जातो. सन २०२०-२१ चा माणगांव तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार लोकमान्य ज्ञानदिप विद्या मंदिर साई हायस्कूलचे शिक्षक चंद्रकांत अधिकारी सर यांना जाहिर झाला आहे. श्री अधिकारी सर यांनी शाळेच्या उन्नतीकरिता सातत्याने प्रयत्नशील असतात. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास व समाजातील वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. त्याचबरोबर शाळेत अंधश्रद्धा निर्मुलन होण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. 

वनराई बंधारा बांधणे, जाखडी नाच यांचे मार्गदर्शन करतात. शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये तालुका,जिल्हा व विभाग स्तरावर विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन करतात. मनोरे, कसरतीचे प्रकार योगासने व आखाड्याचे विविध प्रकार करून दाखवण्यात हातखंडा आहे. इयत्ता नववीच्या नवीन पुनरचित अभ्यासक्रमाचे त्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर प्रशिक्षण दिले आहे. आज त्यांनी घडवलेले विद्यार्थी विविध शासकीय अधिकारी तसेच नामांकित पदांवर समाजात काम करत आहेत. 

अशा या बहूआयामी शिक्षकास या वर्षीचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गजानन अधिकारी, उपाध्यक्ष बळीराम लाड, सचिव गणेश पवार, खजिनदार भिवाजी कठे, सुभाष जाधव संस्थेचे सर्व सदस्य, मुख्याध्यापिका सुजाता पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधूनी तसेच प्रशांत आधिकारी, प्रमोद देशमुख इब्राहिम जुवले विद्यानंद आधिकारी, प्रकाश टेटविलकर या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच साई पंचक्रोशीतील सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog