मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

मंदिरं सुरू नाही केली तर टाळे तोडून मंदिरात प्रवेश करू 

विश्व हिंदू परिषदेचा इशारा

माणगांव (राजन पाटील) :

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामध्ये इतर सर्व गोष्टींसोबतच राज्यातली मंदिरं देखील बंद करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक आणि मिशन बिगीन अगेनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या असल्या तरी राज्यातली मंदिरं मात्र अजूनही बंदच आहेत. यामुळे मंदिरं देखील सुरू करण्यात यावी अशी मागणी अनेक संस्था, संघटना आणि काही राजकीय पक्षांकडून देखील केली जात आहे. राज्यात आता व्यायामशाळा, जिम, बगीचे, एसटी, अशा सर्व सुविधा काही नियमांच्या अटींवर सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मंदिरं सुरू करण्यात परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, तात्काळ मंदिरं सुरू नाही केली तर टाळे तोडून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा आता विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. 

त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज तळा प्रखंडामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तळा प्रखन्ड मंत्री गणेश मानकर, गोरक्षा प्रमुख अंकित खेडेकर, राजू जाधव, सुधाकर कलंबे, रवी मुंढे, मधुकर वारंगे, रामदास तळकर यांसह अनेक कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog