ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सहारा ग्रुप मांजरवणे येथील मुस्लिम युवकांनी घडविले माणुसकीचे दर्शन 

माणगांव (राजन पाटील) :

आज संपूर्ण जगावर कोविड-१९ चे सावट असले तरी बराचसा युवक वर्ग मोबाईल, चंगळवाद यामध्ये गुंतला आहे. त्यामुळे सामाजिक कार्य करण्याचे भान आजच्या तरूण पिढीकडे कमी आहे. मात्र सहारा ग्रुप मांजरवणे येथील युवकांनी कुमशेत घाट रस्त्याच्या वळणावर वाढलेली झाडे, वेली यांची तोड करून स्वच्छता केली आणि आजच्या तरुण पिढी समोर आदर्श ठेवला आहे. 

सद्यस्थितीमध्ये माणगाव-म्हसळा-श्रीवर्धनकडे जाणारे पर्यटक, मार्गस्थ, कर्मचारी साई भागातील रस्त्याचे काम चालू असल्याने कुमशेत-मांजरवणे मार्गे प्रवास करणे पसंत करतात. रस्ता चांगला असल्याने कुमशेत मांजरवणे मार्गे घाटातून वाहने सुसाट वेगाने ये-जा करतात. त्यामुळे वळणावर वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारी वाहने न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असते. असे अपघात होऊ नयेत याकरिता सामाजिक कार्याचे भान ठेवून मांजरवणे येथील सहारा ग्रुपच्या मुस्लीम तरूणांनी हा नवीन आदर्श निर्माण केला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या ग्रुप मधील लतीफ कर्जिकर, जाकरीया कर्जिकर, आदम नगदादे, साजिद सनगे, नुर वलिले, मुनीर सनगे, शाकीब सनगे, वाजिद सनगे या युवकांनी मोठ्या मेहनतीने हे सामाजिक कार्य केले आहे. खरं तर हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हे काम या स्वयंसेवी ग्रुपला कराेव लागतेय ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. तरीही 'मानवता हाच खरा धर्म!' हे ध्येय उराशी बाळगलेल्या सहारा ग्रुप मांजरवणेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याप्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. अर्जुन पाटील व पत्रकार भिवा पवार हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog