ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

माणगांवमध्ये जनसेवा संघटनेची स्थापना 


माणगांव (राजन पाटील) : आजच्या तरुण पिढीला व्यवसाय मार्गदर्शन करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करणे, स्वयंरोजगार निर्माण करणे, आपल्या उपलब्ध जमिनीत स्थानिक पातळीवर फळभाज्या लागवड करणे, शिवकालीन  संस्कृती जतन करणे, देव-देश आणि धर्म या संकल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी प्रयत्न करणे, अन्यायग्रस्त व्यक्ती अथवा संस्था, मंडळ यांना कायदेशीर न्याय देण्यासाठी माणगाव मध्ये अॅड. अनिकेत ठाकूर यांनी जनसेवा संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सचिव योगेश पालकर आहेत. गावा-गावात जावून वादळग्रस्त, वंचित, आदिवासी, अर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना सहकार्य करणे, त्याचबरोबर आपले धार्मिक सण  यांचे महत्त्व जाणून सण साजरे करण्यात सहकार्य करणे, बहुजन समाजाला सहकार्य करणे हे जनसेवा संघटनेचे ध्येय असल्याने ही संघटना सध्या आशेचा नवा किरण ठरत आहे. 

या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे विधिज्ञ असल्याने अन्यायग्रस्त शेतकरी, कामकरी यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कटीबद्ध आहे असे अॅड. अनिकेत ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यांनी याअगोदर 'सावित्री प्रतिष्ठान'च्या माध्यमातून अनेक शाळांना वह्या व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करून अनेक विदयार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. समाजातील वंचित, बहुजन यांचा एक हक्काचा माणूस म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते.

Comments

Popular posts from this blog