ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

निसर्ग चक्रीवादळग्रस्त वनवासी कुटूंबाना वनवासी कल्याण आश्रमाने दिला आधार! 

माणगांव (राजन पाटील) : ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे अपरिमीत नुकसान केले. या निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते आदिवासी वाडीवरील निवासी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे पाहता कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या योगदानातून, सहकार्यातून भोस्ते आदिवासी वाडीवर एकूण १६ निवासी घरांचे बांधकाम करुन या १६ कुटूंबांना आधार दिला आहे. या पक्क्या घरांचा या वनवासी कुटुंबांना ताबा देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. रविवार दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम भोस्ते आदिवासी वाडीवर संपन्न झाला. 

याप्रसंगी व्यासपीठावर वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राच्या अध्यक्षा ठमाताई पवार, प्रतिबींब चॅरिटेबल ट्रस्टचे नरेश पडिया, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे  मा. सोमयाजुलू जी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा 'न्यूज २४ तास मराठी'चे रायगड जिल्हा प्रतिनिधी श्री. भिवा पवार, वनवासी कल्याण आश्रम रायगड चे अध्यक्ष यशवंत पवार, सदस्य श्रीधर कोचरेकर, सचिव श्री. रविंद्र बोरसे, सरपंच श्री.जावळेकर, भोस्ते आदिवासी वाडीचे अध्यक्ष श्री.अंकुश जाधव, कोकण प्रांत सहसचिव श्री. परशुराम गावीत, श्री. विजय सावंत, अमित साठे, जयंत अभ्यंकर, श्री. काशिनाथ गाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी देशातील वनवासी बांधवांच्या विकासासाठी  वनवासी कल्याण आश्रम सातत्याने अहोरात्र काम करीत आहे. वनवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक, आरोग्य अशा विविध बाबींचा विकास करण्यासाठी समाजातील अन्य स्वयंसेवी संस्था, व्यक्तीगत पातळीवरून सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog