ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

उसर हायस्कूलने जपली माणूसकी, वनवासी बांधवांना केले दिवाळी फराळाचे वाटप

माणगांव (राजन पाटील) : सामाजिक समरसतेचे भान ठेऊन आपल्या शाळेच्या परिसरातील वनवासी वड्यांवर राहणाऱ्या समाजाच्या गरजा ओळखून दिवाळीच्या सणामध्ये वनवासी बांधवांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता चरई गौळवाडी आदिवासी वाडी व लालमाती जवळ असलेल्या आदिवासी वाडीवर जाऊन तेथील वनवासी बांधवांना फराळाचे वाटप करून माणूसकी जपली आहे. या अनोख्या उपक्रमाकरिता अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द, ता. तळा, जि. रायगड या हायस्कूलच्या नागनाथ सुर्वे व विनोद लाड तसेच इतर सहकारी यांनी पुढाकार घेऊन देगाव सजाचे तलाठी श्री. चंद्रकांत बंदपट्टे यांच्या दानशूरतेतून प्राप्त झालेल्या या दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळीच्या फराळाचे वाटप केल्याने या वनवासी पाड्यावरील तान्ही लेकरं, आजी- माजी विद्यार्थी, आबालवृद्ध यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

दिवाळीच्या सणात आपल्या सुख दु:खात सहभागी होणारा हा शिक्षक वर्ग जेंव्हा फराळ घेऊन जातो त्यावेळी या आदिवासीवाडीवरील वातावरणात झालेला बदल, त्यांचा आनंद, उत्साह अनुभव वाखाणण्यासारखा असतो असे मत श्री. विनोद लाड यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog