ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना आरक्षण जाहीर केल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत

माणगांव (राजन पाटील) : हे शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून लागू केले जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने २ डिसेंबर २०१९ ला निवेदनाद्वारे सैनिक विद्यालयात ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती व आंदोलनेही केली होती व ओबीसी  पार्लमेन्ट कमेटीचे अध्यक्ष खा. गणेश सिंग याच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. भारतातील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे व ओबीसी पार्लमेन्ट कमिटी अध्यक्ष गणेश सिंग याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, कर्मचारी अधिकारी महासंघ राज्याध्यक्ष शाम लेडे, राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले, दिनेश चोखारे, रणजित डवरे, प्रा. शेषराव येलेकर, बबलू कटरे, विजय पिदूरकर, सुषमा भड, कल्पना मानकर यांनी आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog