ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

बोर्लीपंचतन ग्रा.पं.च्या घंटागाडीची वाजली घंटा! 

दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीला सध्या गावातील काही बेजबाबदार नागरिकांमुळे एका नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. बोर्लीपंचतन गाव हे विस्ताराने व लोकसंख्येच्या मानाने मोठे व प्रमुख बाजारपेठ असल्याने ग्रामपंचायतीकडून दररोज घंटागाडीद्वारे संपूर्ण गावातील गल्लीबोळात व प्रत्येकाच्या घरातील कचरा उचलून तो कचरा डेपोमध्ये टाकला जातो. परंतु मागील आठवड्यात ग्रामपंचायतीची घंटागाडी नादुरुस्त असल्याने कचरा उचलण्यासाठी उपलब्ध नव्हती. तरीसुद्धा छोट्या-छोट्या हातगाड्यांद्वारे गावातील प्रमुख ठिकाणचा कचरा उचलण्याचे काम ग्रामपंचायतीकडून चालूच होते.

दिवसभर गावातील कचरा संकलनाचे काम झाल्यानंतर घंटागाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उभी असते. रात्रीच्या वेळी काही ग्रामस्थ त्या गाडीमध्ये आपल्या घरातील कचरा आणून टाकतात. याबाबत कोणतीही तक्रार असण्याचं कारण नाही; परंतु मागील आठवडाभरापासून दुरुस्तीअभावी ग्रामपंचायतीच्या आवारात रात्रीच्या वेळी घंटागाडी उभी नसल्याने काही बेजबाबदार नागरिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आपल्या घरातील कचरा टाकून अस्वच्छता पसरवून आपल्या बेशिस्तपणाचे दर्शन घडवीत आहेत. आज मात्र या गोष्टीने कहरच केला असून शनिवार दि. ३१ ऑक्टोबरच्या रात्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात असलेल्या ध्वजस्तंभ ज्यावर १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी व २६ जानेवारी या आपल्या प्रजासत्ताकदिनी देशाचा तिरंगा ध्वज आभिमानाने फडकावून त्याला मानवंदना देऊन आपले देशप्रेम प्रकट करतो त्याच ध्वजस्तंभाच्या पुढ्यात कचरा टाकून काही समाजकंटकांनी आपल्यातली विकृत मनोवृत्तीसुध्दा चव्हाट्यावर आणली आहे.

या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक व अन्नपदार्थ असल्याने ते खाण्यासाठी मोकाट प्राणी येतात. तसेच अन्न सडून त्याची दुर्गंधी पसरते. कोरोनासारख्या महामारीला तोंड दिल्यानंतर देखील स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामस्थांकडून चाललेला हा हलगर्जीपणा गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकतो. कचरा संकलनाची शिस्त ही सर्वांनीच पाळली पाहिजे तरी ग्रामपंचायत कार्यालयाचे व तेथील ध्वजस्तंभाचे पावित्र्य पायदळी तुडविणाऱ्या लोकांवर सक्त अशी दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog