ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

शिलिम-मांजरवणे परिसरातील मोबाईल मनोरा कार्यान्वित करण्याची जनतेची मागणी 

माणगांव (राजन पाटील) : आजच्या गतिमान युगात  संगणक तसेच मोबाईलच्या आंतरजालामुळे जग जवळ आले आहे. संवाद, दूरवरचे संदेशवहन, एकमेकांना पाठवलेल्या चित्रफिती, ध्वनीफिती मिळण्यासाठी कार्यान्वित मोबाईल मनोऱ्यामुळे शक्य होते. परंतु या परिसरातील जिओ कंपनीचा मोबाईल मनोरा कार्यान्वित नसल्याने येथील जनतेला अन्य ठिकाणी संपर्क साधता येत नाही. येथीला मोबाईल मनोरा कार्यान्वित नसल्याने दुरस्थ शिक्षण प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. 

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता आता शाळा बंद आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला उपयुक्त व्हावे याकरिता सरल प्रणालीच्या सहाय्याने शिक्षण पद्धती सुरू केली आहे. मोबाईलच्या आधारे सोशल मीडियाचा वापर, उपलब्ध यू-ट्यूबच्या शैक्षणिक ध्वनीफिती, चित्रफिती  मोबाईल नेटवर्किंग नसल्याने विद्यार्थ्यांना पाहता येत नाही. त्यामुळे या शिलीम-मांजरवणे परिसरातील सर्वच विदयार्थी व पालक नाराज आहेत. या पंचक्रोशीतील शिलीम, वडघर मुद्रे, निगुडमाळ, बाट्याची वाडी यांसह इतर गावांमधील विद्यार्थी व पालक वर्ग हा तयार स्थितितील मोबाईल मनोरा कार्यान्वित होण्याची मागणी करीत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog