सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई तर्फे वह्यांचे संच वाटप
माणगांव (राजन पाटील) : ग्रामीण, दुर्ग, डोंगराळ भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता सेवाभावी वृत्तीने दरवर्षी सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून शैक्षणिक संच ज्यामध्ये दप्तर, वह्या, रंगपेटी ब्रश, कंपासपेटी असा भला मोठा दिला जातो. पण आज संपूर्ण जगभरात कोविड -१९ चा सावट असल्याने यामध्ये बदल करून सेवा सहयोगच्या सदस्यांनी बदल केला. यावर्षी शनिवार दि. ७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठिक १०.०० वा. माध्यमिक विद्यामंदिर रातवड या हायस्कूलमध्ये माणगाव तालुक्यातील १५ शाळांना एकूण ९५,०००/- रूपये किमतीच्या वह्यांचे संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई च्या सहयोगी दिपाली देवळे, राम रोकडे, विशाल देसाई, चंद्रशेखर पाटील, रातवड हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव जाधव उपस्थित होते.
शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक मदतीची गरज असते. ही गरज ओळखून दरवर्षी हे शालेय संच विद्यार्थ्यांना शाळांच्या माहीती प्रमाणे वाटप करत असतो याकरिता आपल्याच समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ही मदतीची निर्मीती केली जाते आणि ही मदत गरजूंपर्यंत पोहचविण्याचे कार्य सेवा सहयोग फाऊंडेशन करते असे दिपाली देवळे यांनी सांगितले.


Comments
Post a Comment