ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन उद्योगाला दिलासा, पर्यटकांची रेलचेल सुरु

बोर्लीपंचतन (मुझफ्फर अलवारे) : कोरोना महामारीने झालेल्या टाळेबंदीत शासनाने टप्प्या-टप्प्याने सर्व व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिल्याने आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. अनलॉक पाचमध्ये गेले आठ महिने ठप्प झालेल्या पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी काही आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करुन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिल्याने श्रीवर्धन तालुक्यातील विविध किनाऱ्यावर पर्यंटकांची रेलचेल दिसू लागली आहे. यामुळे गेले आठ महीने बंद असलेला तालुक्यातील पर्यटन व्यवसाय हळूहळू सुरु होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना महामारी पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे हेदेखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने व्यावसायिकांची अवस्था बिकट झाली होती. याचा मोठा फटका खानावळ व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक यांच्यासह पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर छोट्या घटकांनाही बसला होता.

मात्र आठवड्याभरापासून श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असणाऱ्या दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, शेखाडी, आदगाव, वेळास आगर याठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल काही प्रमाणात दिसून येत आहे. गेले आठ महिने लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला या पर्यटकांमुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. परंतु येणारा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने कठीण असून पर्यटकांचे स्वागत करुन आपला व्यवसाय करताना शासनाने दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून आपण व येणारे पर्यटक आरोग्य सुरक्षेचे नियम किती काटेकोर पाळतात यावरच येणाऱ्या दिवाळी सुट्टीमधील पर्यटन व्यवसायाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog