ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रायगडातील शाहीरांच्या माणगावातील मेळाव्यात एकतेचा निर्धार! 

महाराष्ट्रातील पारंपरिक शाहीरी कलेची होणार जपणूक

माणगांव (राजन पाटील) : संगणकाच्या युगात, आंतरजालाच्या महामायेत गुंतलेल्या नवीन पिढीला महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला शाहीरीचा परिचय व्हावा, रायगड जिल्ह्यातील शाहिरी कला, सांस्कृतिक नर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन, समाज प्रबोधन करणाऱ्या  शाहीरांना एकत्र आणावे त्यांचेही संघटन व्हावे या उद्देशाने रविवार दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी माणगावातील कुणबी भवन येथे  रायगड जिल्ह्यातील शाहीरांचा मेळावा संपन्न झाला. 

हा मेळावा यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी आजच्या काळातील सोशल मिडियाचा वापर करून भरत गाणेकर, राजाराम रणपिसे, संतोष कळमकर, योगेश जाधव, चंद्रकांत कदम, उमेश पोटले, भालचंद्र दामा, देवजी मुंडे, हेमंत कांबळे, जगन्नाथ खारगावकर, मधुकर यादव, ज्ञानदीप भोईनकर, गणपत पवार आदी मान्यवरांनी एकत्रिकरण केले. सदर मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी कला सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. रामभाऊ टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर कोलाड-रोहा सांस्कृतिक कला मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाबळे, वाद-विवाद समितीचे अध्यक्ष सुरेश चिबडे, संतोष धारसे, शंकर जाधव, विजय पायकोळी, म्हस्के साहेब, रणपिसे सर, बाळा महाबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्रासह रायगडातील कवीवर्य, शाहीरी, नर्तन कला, सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, नवीन शाहीर निर्माण व्हावेत, शाहीरी कला विकसित व विस्तृत व्हावी याकरिता आपण महत्वपूर्ण योगदान या शाहीरांच्या संघटनेला देऊ. त्याचबरोबर या कलेला योग्य व्यासपीठ मिळण्यासाठी माणगांव सारख्या ठिकाणी एखादा रंगमंच उपलब्ध व्हावा याकरिता आपण पुढाकार घेऊ असे आश्वासन अध्यक्ष तथा कवी शाहीर रामभाऊ टेंबे यांनी दिले. या शाहीरी कलेच्या माध्यमातून होणारे लोकप्रबोधन, जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन, पर्यावरण संरक्षण, शिवस्तुतीतून निर्माण होणारे चैतन्य पाहता ही शाहीरी कला टिकली पाहिजे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 

कोरोनाच्या महामारीत आपण उद्बोधन करून या समाजातील निराधाराला आधार दयावा. आपली शाहीरी कला मनोरंजनाबरोबर सकल समाजाचा आधार ठरावा  अशा मोठ्या उद्देशाने ही शाहीरांची संघटना आपण स्थापन करीत आहोत असे प्रतिपादन श्री. चंद्रकांत कदम बुवा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदीप भोईनकर व चंद्रकांत दामा यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उदय चिबडे यांनी मानले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog