तळा तालुका जूनी पेन्शन संघटना सभा संपन्न, तालुका कार्याकारणी जाहीर
माणगांव (राजन पाटील) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त पण त्यानंतर १००% अनुदान प्राप्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला शासनाने जूनी पेन्शन हक्क नाकारला. तसेच त्यांना नवी पारिभाषित अंशदायी पेन्शन (डी.सी.पी.एस.) योजना लागू केली. खरं तर रायगड जिल्ह्यातच अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गावर ही वेळ आली आहे. त्यातच शासनाने वेळोवेळी काढलेले परिपत्रक व प्रशासन स्तरावर आधिकारी वर्गांनी लावलेला त्याचा चूकीचा अर्थ यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना डी.सी.पी.एस. पेन्शन योजना स्वीकारण्यास भाग पाडणे, त्याचा दरवर्षी हिशोब न देणे, नवीन एन.पी.एस. योजना जबरदस्तीने लादणे. अशा प्रकारच्या योजनांचा विरोध करून आपल्याला जूनी पेन्शन योजना लागू करावी या तत्वाला अनुसरून राज्य व जिल्हा पातळीशी संलग्न म्हणून असणाऱ्या रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक जूनी पेन्शन हक्क संघटनेची शाखा म्हणून तळा तालुक्याची संघटना स्थापन करण्यात आली. इंदापूर-तळाशेत साईनगर येथील मनोज सुतार यांच्या नि्वासस्थानी सदर संघटनेची स्थापना करण्यात झाली. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राजन पाटील, विद्याधर जोशी, पांडुरंग उभारे उपस्थित होते.
तळा तालुक्यात स्थापन झालेल्या या जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या अध्यक्ष पदावर मनोज सुतार (उसर हायस्कूल) उपाध्यक्ष पदावर किरण चव्हाण ( बोरघर हायस्कूल) व परमानंद कजबजे (महागाव हायस्कूल) सचिव पदावर सुनिल तेलंगे (पिटस ई हायस्कूल) सहसचिव पदावर संजय म्हस्के (पढवण हायस्कूल) खजिनदार पदावर प्रशांत शिंदे (बोरघर हायस्कूल) सह खजिनदार पदावर संदेश नाडकर तर सल्लागार म्हणून एन. सी. पाटील, आर. बी. वाल (तळा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय) व सदस्य म्हणून विनोद लाड , दिपक गुजर (उसर हायस्कूल), विद्या मांडवकर (बोरघर हायस्कूल) नितीन गुरव, (महागाव हायस्कूल) यांची निवड करण्यात आली. मुळात या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही २००५ पूर्वीची असताना शासनाने आपली अर्थिक बाजू कमकुवत असल्याने अनुदानाच्या टप्प्यात बदल केल्याने या संबंधित कर्मचाऱ्यांना या जूनी पेन्शन योजनेस सद्यस्थितीमध्ये मुकावे लागते पण यामध्ये या कर्मचाऱ्यांचा काही दोष नसताना हा अन्याय सहन करावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
संविधानातील कलम १४, कलम ३८ व कलम ३९ (क) कलम ४३ कलम १८८ नुसार विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य यांना निवृत्ती वेतन मिळते मात्र भविष्य निर्वाह निधीच्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेली पेन्शन योजना समानतेच्या तत्त्वावर शासन नाकारते. हा हक्क प्राप्त करण्यासाठी आपण ही संघटना स्थापन करत आहोत असे मत माणगाव तालुका अध्यक्ष राजन पाटील यांनी मांडले. या संघटनेत तळा तालुक्यातील २००५ पूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्याधर जोशी व पांडुरंग उभारे केले. सभेचे प्रास्ताविक तेलंगे सर यांनी केले तर सभेला हजर असणाऱ्या शिक्षकांचे आभार विद्या मांडवकर यांनी मानले.



Comments
Post a Comment