ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत माणगांव वाहतूक पोलीसांतर्फे वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन

माणगांव (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल येलवे, पोलीस नाईक अक्षय जाधव, रावसाहेब कोळेकर, लालासाहेब वाघमोडे यांनी महामार्गावरून जाणारे वाहनचालक, तसेच माणगांव येथील अशोकदादा साबळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले. 

दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करावा. वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवू नये. मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वाहन चालविताना लेनकटींग करू नये. रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये. पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा व नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

१८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय व वाहन चिलविण्याचे लायसन्स मिळविल्याशिवाय मुलांनी वाहन चालवू नये. वाहतूकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन माणगाव वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल येलवे यांनी अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog