मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

मेहंदळे वाडा येथील नाल्यावर अनधिकृत बांधकाम!

रोहा शहरातील अनधिकृत बांधकामाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष!

रोहा (समीर बामुगडे) : रोहा शहरातील मुख्य बाजरपेठेतून जाणाऱ्या मेहंदळे वाडा येथील रस्त्यावर रोहा येथील एका नामवंत बांधकाम व्यावसायिकाने गटारावर अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून येत आहे. रोहा-तांबडी प्रमुख जिल्हा मार्गावर उभ्या असलेल्या या अनधिकृत इमारतीकडे जाताना प्रवासी वर्गाला व वाहनचालकांना अडचणींचा समाना करावा लागत असून या वाढीव बांधकामावर रोहा नगरपालिका प्रशासाने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. 

सदर अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावून काही महिन्यांनी तात्पुरती कारवाई केली होती. पण कोरोना काळात प्रशासकीय राजवटीत बिल्डरने काम सुरु करुन इमारत पूर्ण करणयाचा सपाटा लावला आहे. या बांधकामावर रोहा नगरपालिका प्रशासाने कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

Comments

Popular posts from this blog