ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोठ बुद्रुक येथे धाटाव शिवसेना विभाग आयोजित रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी केले रक्तदान! 

शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न

धाटाव/रोहा (किरण मोरे) : देशात व राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांसाठी रक्ताची आवश्यकता लागत आहे, त्यासाठी रोठ बुद्रुक येथे धाटाव शिवसेना विभाग यांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख श्री. समीर शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबीराला शिवसेना तालुका प्रमुख श्री. समीर शेडगे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी धाटाव विभागप्रमुख तथा रोठ बुद्रुकचे सरपंच श्री. नितिन वारंगे यांची रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनासाठी आयोजकांचे विशेष कौतुक केले. तसेच सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. सदर रक्तदान शिबिरात धाटाव व परिसरातील २६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती सरपंच नितीन वारंगे यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. समीर शेडगे यांच्या हस्ते सौ. अमृता साळुंखे यांना धाटाव महिला विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती पत्र  देण्यात आले.  तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. अशोक धात्रक : सरपंच नागोठणे ग्रामपंचायत, श्री. विजय बोरकर : उपजिल्हा प्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष, नीताताई हजारे : महिला रोहा तालुकाप्रमुख, समीक्षा बामणे : नगरसेवक रोहा नगरपरिषद, अनिष शिंदे : रोहा तालुकाप्रमुख - ग्राहक सरक्षण कक्ष, निलेश वारंगे :  शाखा प्रमुख रोठ बुद्रुक, वैभवी भगत : ग्रामपंचायत सदस्य रोठबुद्रुक, सचिन मोरे : शाखा प्रमुख रोठखुर्द, सागर भगत : युवा सेना अधिकारी धटाव विभाग, जयेश माने : शाखाप्रमुख तळाघर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सुप्रिया वारंगे, समीर वारंगे, सतीश वारंगे, शशिकांत साळुंखे, प्रमोद तांबडे, रोहिणी गोसावी, निरंजन वारंगे, सीमा वारंगे व इतर सर्व शिवसेना धाटाव विभागाचे कार्यकर्ते व महिला आघाडी चे सदस्य, शासकीय रक्तपेढि अलिबागचे डॉ. दिपक गोसावी व टीम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog