ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

सिडकोचा नियोजनबद्ध विकास, की फक्त दिखावा?

खारपाडा (सुरेश तांडेल) : रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात विकासाच्या नावाखाली भकास! असे चित्र पाहायला मिळत आहे. येथे झंजावाती पावसात खरा भकासपणा बाहेर आला. ग्रामस्थ्यांच्या उठावानंतर फक्त बंद केबिनमध्ये नियोजन करणाऱ्यांचा भकास कारभार समोर आला. उरण येथील नवघर येथे मुसळधार पावसामुळे  गावातील घरांमध्ये तसेच सखल भागासहित रस्त्यावर, गल्लोगल्यांमध्ये पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हे पाहून ग्रामस्थ मंडळ नवघरच्या पदाधिकाऱ्यांनी गावाची पाहणी करून ही बाब सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावर योग्यती उपाययोजना करण्यास भाग पाडू असे ग्रामस्थांना सागितले गेले. ग्रामस्थ मंडळ नवघरचे पदाधिकारी यांनी द्रोणागिरी येथील सिडको आ‌ॅफीस बोकडवीरा येथे जाऊन सिडको कार्यकारी अधिकारी द्रोणागिरी-२ 

एच. डी. नहाने तसेच सुहास मागले यांची भेट घेऊन चर्चा केली. नवघर गावातील पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्या बाबत सविस्तर चर्चा करून वरील सिडकोच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यास नवघर गावात आणून पाहणी केली. यावर योग्य ती उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत नवघर आणि ग्रामस्थ मंडळ नवघर, नवघरपाडा यांची बुधवार दिनांक २९ जुलै २०२१ रोजी सयुक्त बैठक सिडको कार्यालय द्रोणागीरी बोकडवीरा येथे घेतली. योग्य तो निर्णय आपण सर्वांन मिळून घेऊ असे सांगितले. 

नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील यांनी पाहणी करण्यास आलेल्या सिडको अधिकाऱ्यांचे  आभार मानले. यावेळी नवघर पाड्याचे अध्यक्ष अमित कृष्णा बंडा नवघर ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार ज्ञानेश्वर मधुकर भोईर,प्रमोद महादेव भोईर, ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश मधुकर भोईर, रविंद्र सदानंद पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदिप पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog