मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा घंटा गाडी लोकार्पण सोहळा व खारपाडा येथील बापूजी देव रस्त्याचे भूमीपूजन

खारपाडा (सुरेश तांडेल) : ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा येथे महाराष्ट्र राज्याच्या उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. 

पेण तालुक्यातील दुष्मी-खारपाडा ग्रामपंचायत अंतर्गत 15 व्या वित्त आयोगच्या निधीतून कचरा वाहक वाहनाचे (घंटागाडी) लोकार्पण व खारपाडा येथील बापूजी देव रस्त्याचे भूमिपूजन  ना. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष श्री. दयानंद भगत, पेण. शहराध्यक्ष श्री. जितेंद्र ठाकूर, श्री. दिपक गुरव, सरपंच सौ. रश्मी भगत, श्री. परशुराम मोकल, श्री. विजय पाटील, श्री. अनिल म्हात्रे, तसेच प्रांताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते. 

ग्रामपंचायतीने गाव कचरा मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. अस्वच्छतेने अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी व गावातील अस्वच्छता दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत कचरा व्यवस्थापन करण्याचे योजले असून ग्रामपंचायत कचरामुक्त करण्याचा निर्धार केला आहे.

Comments

Popular posts from this blog