तामसी बंदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था
छावा क्रांतिवीर सेनेकडून दुरुस्तीची मागणी
खारपाडा (सुरेश तांडेल) : पेण तालुक्यातील नारवेल, बेनवले खारभूमी योजनेतून काम जागतिक अनुदानातून राष्ट्रीय चक्रीय धोके निवारण प्रकल्पांतर्गत मे. प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स या कंपनी मार्फत प्रगती प्रथावर आहे. मात्र सध्या हे काम बंद आहे.
या कार्यक्षेत्रावर कामसाठी लगणाऱ्या साहित्याची वाहतूक अवजड वहानातून लाखोली ते तामसी बंदर या अंतर्गत वाहतूक आस्तिवात असलेल्या रस्त्यावरून होत आहे. त्यामुळे तामसी बंदर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील बोकरवाडी, जनवली, नागुवाडी, ठाकूरबेडी, घोडा बंदर, तामसी बंदर आदी गावातील ग्रामस्थांचा रहदारीचा असणारा रस्ता हा खड्डे व चिखलमय झाल्याने या रस्त्यावरून ये-जा गैरसोय होऊ लागली आहे. यासंदर्भात पेण तालुका छावा क्रांतिविर सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स कंपनी, तहसिलदार पेण, तसेच खारभूमी विकास उपविभाग पेण यांच्याकडे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्द्ल लेखी निवेदन देवून त्याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली.
सदर निवेदानाची प्रत नुकतिच् जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही देण्यात आली आहे. तसेच याबाबत खारभूमी विभागामार्फत संबधीत ठेकेदाराला तामसी बंदर येथे जाणार्या रस्त्याची ततडीने दुरुस्ती करून द्यावी. तसेच आपल्या मुळे ग्रामस्था ची गैर सोय होणार नाही याची दक्षता घेण्यात घ्यावी. असे पत्र देण्यात आले होते तरी सुद्धा ठेके दारा कडून सदर् रस्त्याची रहदारी साठी कोणतीही दागडूजी न करता केवल माती टाकल्याने पावसच्या पाण्याने त्या मातीचा चिखल होत आहे. येणार्या सनांच्या काळात ग्रॅमस्त , पाहुणे, विद्याथी, तसेच शेतकरी यांना या मुळे खुप त्रास ( मानस्ताप) सहन करवा लागत आहे.
येत्या गणेशत्सवाच्या आत सदरच्या रस्त्याची डागडुगी न केल्यास ठेकेदारा विरोधात कड़क कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेना पेण तालुका अध्यक्ष श्री. जितेंद्र ठाकूर यांनी केली. यांच्या सोबत सम्पुर्ण रायगड जिल्हा कार्यकारिणी गेली होती. रायगाड जिल्हा अध्यक्ष रोशनदादा पवार, रायगड संपर्क प्रमुख स्वप्निलदादा घरत, खालापूर तालुका अध्यक्ष अशोक घरत, उप तालुका अध्यक्ष आदित्य वाघ, उरण तालुका अध्यक्ष अभिजीत मोकल, उप तालुका अध्यक्ष नरेशदादा म्हात्रे, पेण शहर अध्यक्ष दिपक संसारे, मुरूड अलिबाग तालुका अध्यक्ष आणि सर्व टीम पदाधिकारी उपस्थित होते

Comments
Post a Comment