मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

रोहाडाय कंपनीचे प्रदूषण वाढत चाललेय 

परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका! 

धाटाव/रोहा (किरण मोरे) : धाटाव औद्योगिक परिसरातील रोहाडाय केम प्रा. लि. कंपनीतून बाहेर पडणारे केमिकलयुक्त दुषित पाणी हा सध्या चर्चेचा विषय बनून राहिला आहे. हे केमिकलयुक्त पाणी या परिसरातील शेतीमध्ये जात असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.

या कंपनीच्या परिसरातील रोठ खुर्द, रोठ बुद्रूक, निवी, वाशी, लाढर, तळाघर, बोरघर या गावांतील नागरिकांच्या शेतीवर देखील या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होऊन येथील भातशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या कंपनीविरूद्ध कारवाई का करत नाहीत? त्यांची कंपनीसोबत सेटींग तर नाही झाली ना? त्यांना कंपनीकडून हफ्ता पोहोचतो का? असे अनेक प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभे राहिलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog