ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

राजेवाडी येथील जय हनुमान मित्र मंडळाने गावातील रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली!

धाटाव (किरण मोरे) : प्रत्येक गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. रस्ता आहे की खड्ड्यातून वाट आहे असे वाटते आणि पावसाळ्यात तर फार बिकट अवस्था असते. त्या खड्ड्यात पाणी साठवून चिखलाचे साम्राज्य असते. या अवस्थेला पूर्णपणे राजकीय व्यक्ती व शासकीय अधिकारी जबाबदार असतात. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार त्यातून निकृष्ट दर्जाचे काम याचा मनस्ताप ग्रामस्थांना भोगावा लागतो, अशा प्रकारे भिसे ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गाव गावातील रस्त्याची अवस्था वर्षानुवर्षे खराब आहे. या गावातील प्रश्नावर गावातील तरुणांची संघटना जय हनुमान मित्र मंडळ राजेवाडी हे मंडळ गावाची स्वच्छता व गावाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असते. त्याचास भाग म्हणून या तरुणांनी जे गावात रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला. रविवारी या मंडळाचे कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम ठमके यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले व पूर्ण दिवसात गावातील रस्त्यावरिल खड्डे सिमेंट व खडी वाळू स्व:खर्चाने आणून बुजवले असून यांनी आपल्या गावाशी व समाजाशी असणारी बांधिलकी दाखवली.   त्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम ठमके यांनी आमच्या प्रतिनिधी शी बातचीत करताना सांगितले की, आम्हाला या रस्त्या संदर्भात राजकारण्यांकडून फक्त आश्वासने मिळली. त्यामुळे आमच्या मंडळींनी हा उपक्रम हा हाती घेतला व पूर्ण केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार!

Comments

Popular posts from this blog