ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

देशाच्या आर्थिक राजधानीत सर्वसमावेश विकासासाठी ब.स.पा.च पर्याय!

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा - ॲड. संदीप ताजने 

साई/माणगांव (हरेश मोरे) : देशाच्या आर्थिक राजधानीतील झोपडपट्टींचा विकास करीत झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी बसपा कटिबद्ध आहे. येत्या काळात मुंबईचा सर्वसमावेश विकास करायचा असेल, तर महानगर पालिकेच्या चाव्या बहुजन समाज पार्टीकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी मंगळवारी केले. संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात करतांना धारावीतील अशोक मील कंपाउंड येथील रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.

मुंबईत सर्वत्र जागेची अडचण आहे. झोपडपट्टीत संसर्गजन्य रोग तसेच अठराविश्व दारिद्र्यात शोषित, पीडित, गरीब बांधव जगण्यास मजबूर आहे. अशात झोपडपट्टींच्या विकासासाठी सरकारकडून आणि महानगर पालिकेकडून करण्यात येणारे प्रयत्न तोकडे पडत आहेत. झोपडपट्ट्यांचा विकास त्यामुळे रखडला आहे. बिल्डरांना हातीशी घेवून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याऐवजी त्या हटवण्याकडे सरकार कल अधिक आहे. पंरतु, गरीब, शोषितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बसपाच पर्याय आहे. झोपडपट्टी धारकांच्या मागे पार्टी ठामपणे उभी राहील. त्यांच्या विकासासाठी तसेच मुंबईच्या विकासासाठी येत्या बृहन्मुंबई महानगर पालिकेत बसपाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केले. आगामी आगमी महानगर पालिकेत बसपाचा महापौर बसावा याकरिता तयारीला लागण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमात बसपाचे महासचिव प्रा. प्रशांत इंगळे, रामसुमेर जैसवार, प्रदेश सचिव नागसेन माला, मुंबई प्रभारी सुरेश महाडिक, श्यामलाला जैस्वार, कपिल बनसोडे, हाजी मोहम्मद अली, मुंबईचे अध्यक्ष प्रवीण धोत्रे, उपाध्यक्ष शैलेश पवार, महिला अध्यक्ष पायल खरे, ॲड. प्रणाली पाते, शिवानंद काका अध्यक्ष धारावी विधानसभा, सचित कांबळे महासचिव मुंबई, विनोद मोरे कोषाध्यक्ष मुंबई, मिलारी पाली, मनोज हाळदे, सुरेश कांबळे, महेंद्र शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वजनांचे हित, बसपाचे उद्दिष्ट उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात ब्राम्हण वर्ग बहन मायावती जींच्या नेतृत्वात एकत्रित झाला आहे. यंदा पाचव्यांदा बहनजींच्या नेतृत्वात बसपाचे सरकार उत्तर प्रदेशात येणार आहे. ब्राम्हणांसह सर्वजनांचे हित केवळ बसपातच सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांनी बसपाच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवहन प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केले.महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाला पार्टीसोबत जोडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येईल, असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. महिला आणि तरूणांना येत्या निवडणुकांमध्ये योग्य भागीदारी दिली जाणार असल्याचे रैना म्हणाले.

Comments

Popular posts from this blog