स्वराज्य भूमी कोकण महामार्ग जन आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थानिकांचे जन आंदोलन
खारपाडा (सुरेश तांडेल) : हे आंदोलन मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळ पळस्पे ते शिरढोण या गावाजवळ साखळी आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन करण्यामागचा उद्देश मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे स्थानिकांनी साखळी आंदोलन करण्यात आले गेल्या 13 वर्षा पासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे राखडलेले आहे. याच महामार्गावर मागील 13 वर्षात सुमारे 2500 अपघात होऊन आनेकानाचे बळी गेले आहेत. यास जबाबदार व्यवस्थेचा निषेध नोंदवून अपघातात मृत्यू पावलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि खर्ड्डे मुक्त महामार्गाच्या मागणीसाठी मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता समृद्ध कोकण संघटना समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे मानवी श्रद्धांजली साखळीचे आयोजन करण्यात आले. यां आंदोलनात शेकडो संख्येने लोक उपस्थित झाले होते.
जर समृद्धी महामार्ग ४-५ वर्षात पूर्ण होऊ शकतो तर १३ वर्षे पूर्ण झाली व २५०० हजार लोकांचे बळी गेले तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही. असा सवाल कोकण व रायगड वासी लोकांना पडला आहे. विदर्भातील नेत्यांची ताकद जास्त आहे की कोकण आणि रायगाड़ च्या नेत्यांची ताकद कमी पडली हा सवाल येथील उपस्थित लोकांनी केला. आज कोकणात दिग्गज नेते मंडळी आहेत तरी ही यां महामार्गाचा काम राखडले शिवाय झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे का?
मुंबई - पुणे एकस्प्रेस वे, औरंगाबाद, नागपुर , समृद्धी हायवे, मुंबई, कोल्हापूर, बेंगलोर, सोलापूर अहमदनगर, नाशिक, महाराष्ट्रातील सर्व हायवे चौपदरी करण पूर्ण झाले आणि त्या त्या प्रदेशाचा विकास गतिमान झाला.
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कोकण महामार्ग सर्वात शेवटी बनवायला घेतला. पनवेल ते इदापूर गेली १२ वर्ष, इदापूर् ते राजापूर गेली ६ वर्ष हा रस्ता खोदुन ठेवला आहे. रस्त्यात खड्डे व खड्ड्यात रस्ता हे समजायला मार्ग नाही. कोकणची मुख्य लाइफ लाइन कोकण महामार्ग गेली १२ वर्ष अशा भयानक स्थितीत असल्यामुळे सम्पुर्ण कोकणचा विकास थांबला आहे. पर्यटन व्यवसायला, उद्योगाच्या विकासाला खिल बसली आहे. या दरम्यान हजारो कोकणवासी आणि प्रवासी या रस्त्यावर मृत्यूमुखी पडले. दरवर्षी हा रस्ता पुढच्या वर्षी पूर्ण होईल असे सांगितले जाते पण आज ही या हायवेची स्थिति पाहता हा रस्ता कधी पूर्ण होईल हे परमेश्वराला माहित.
सर्व सामान्य कोकणवासियांच्या सहनशिलतेचा अंत आहे आणि म्हणुनच कोकणातील अनेक सामाजिक संस्था आणि कोकणवासियानी एकत्र येऊन उस्फुर्त जन् आंदोलन केले. आज वर या रस्त्यावर मृत्यूमुखी हजारो कोकणवासियांसाठी श्रद्धांजली मानवी साखळी आयोजित केली. ५ सप्टेबर ते ९ सप्टेबर दरम्यान या खड्डे महामार्गावर गणेश भक्तांचे स्वागत आणि जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. हा हायवे निर्माण करणारी नॅशनल हायवे आथोरिटी आणि निगरानी करणारा राज्य सर्वजनिक बांधकाम विभाग आणि मणमानी करणारे ठेकेदार यांचा निषेध करणारे हे आन्दोलन आहे. यां राजकारणविरहित आंदोलनातमध्ये सर्व जाती, पंथ, धर्म, संघटना व पक्षाचे कार्यकरते आणि सर्वसामान्य कोकणवासिय सहभागी झाले आहेत.
शिवाय या आंदोलनात शासनासमोर आपल्या मागणी आणि काही सूचना मांडल्या. त्या पुढील प्रमाणात १) पुढील एका वर्षात सम्पुर्ण खड्डे मुक्त व खड्डे न पडणारा दर्जेदार कोकण महामार्ग पूर्ण व्हावा. २) हायवेवर असलेल्या शाळा आणि तेथील विद्याथी, प्रमुख गावे, यांच्या सुरक्षितेला प्राधान्य आवश्यक तिथे विद्यार्थ्यांसाठी, माणसाँसाठी आणि जनावारां साठी अंडरपास ची वेवस्था. ३) जेथे आतील गावातील गाड्या मोठ्या प्रमाणात हायवेवर् येतात त्या प्रमुख नाक्यांवर सर्विस रोड आणि गाड्या पलीकडे जाण्यासाठी अंडरपास आणि सुरक्षितता. ४) दरवर्षी शेकडो अपघात करणारी धोकादायक वळणे व घाट मार्ग शक्य तितके सोपे करावेत
या शिवाय स्वराज्यभूमि कोकण महामार्ग - छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मी बाई, टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्रविर सावरकर, भारत रत्न विनोबा भावे, गोपाल कृष्ण गोखले, आगरकर.... शेकडो नर रत्नांची ही पवित्र भूमी असल्या मुळे आशा महान व्यक्तीमत्वाच्या नावाने या हायवेवर चौक सजवण्यात यावेत व प्रेरणादायांई माहिती केंद्र बनवावी.
JNPT, दिघी, उद्योगिक पट्टा असल्याने पनवेल-माणगांव या रस्त्याला सहापदरी आणि सम्पुर्ण सिमेंट रस्ता बनवावा आणि सम्पुर्ण सर्विस रोड असावा. हायवे भरावासाठी डोंगर पोखरू नयेत. उरलेल्या हायवेच्या भरावासाठी नद्यांमधील गाळ काढावा.
गेली ७० वर्ष कोकणावर अन्याय आणि १२ वर्ष खड्डे मुक्त महामार्गामुळे कोकण प्रदेशाचे झालेले अर्थिक नुकसान लक्षात घेऊन रायगड़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्यातील स्थानिक नागरिकाना या हायवेवर टोल आकारू नये. जोपर्यंत सपूर्ण हायवे बनत नाही तोपर्यंत टोल नाही. जगातील सर्वात समृद्ध जैवविविध आपला सह्याद्री म्हणून सर्वात जैवविविधता असलेला महामार्ग म्हणून सर्व झाडे यां हायवेवर् लागवड करून हा देशातील सर्वात सुंदर ग्रीन हायवे बनवावा. हायवेवर दर् २५ किं. मी. वर स्थानिक शेतकार्यांची उत्पादने विक्रीसाठी शेतकरी बजाराची व्यवस्था करावी. अशा प्रकारचे निवेदन देणारे पत्र पनवेल तहासिलदार यांना या आंदोलन दरम्यान देण्यात आले.


Comments
Post a Comment