मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

सम्यक सामाजिक संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले कौतुक 

बेणसे (चंद्रकांत अडसुळे) : सम्यक कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था बेणसे, ता. पेण, जि. रायगड रजि. महाराष्ट्र या संस्थेने केलेल्या सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे यांना शुभसंदेश पत्र देऊन अलिबाग मुरूड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याकडून गौरविण्यात आले. याप्रसंगी बेणसे, झोतिरपाडा शिवसेना विभागीय नेते भाई अशोक भोय, कामगार नेते भाई अरूण कुथे, आदिनाथ अडसुळे, अमोल भोय आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वतीने आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त केले. बेणसे झोतिरपाडा विविध समस्यांवर अशोक भोय यांनी प्रश्न उपस्थित करून आमदार साहेबांनी लवकरच मिटींग त्या विभागासाठी देतो असे सांगीतले.

Comments

Popular posts from this blog