चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड यांच्यातर्फे पुनाडे आदिवासीवाडी येथे महिलांना साड्या आणि धान्य वाटप
खारपाडा (सुरेश तांडेल) : चाइल्ड केअर् सामाजिक संस्थे मार्फत पुनाडे आदिवासी वाडी मधे गरजु महिलांना साड्या व धान्य वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता, दिग्दर्शक श्री राजू पाटील (पप्पूराज), नवघर गावचे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री जयप्रकाश पाटील तसेच नवघर ग्रामपंचायत सदस्या सौ मयुरी पाटील यांच्या उपस्थितीत चाईल्ड केअर सामाजीक संस्था तर्फे 250 साड्या 100 किलो अन्न धान्य वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली झाला. ह्या कार्यक्रमासाठी संस्थे कडून अध्यक्ष कुणाल पाटील, कार्याध्यक्ष विक्रांत कडू, कार्याध्यक्ष ह्रितिक पाटील,कोषाध्यक्ष मनोज ठाकूर मुख्यसचिव आभिषेक माळी, सदस्य आमोल डेरे, विपुल कडू हा कार्यक्रमासाठी आदींनी खूप मेहनत घेतली. पप्पूराज पाटील आणि जयप्रकाश पाटील यांनी मनोगत मांडताना चाईल्ड केअर सामाजीक संस्थे चे संस्थापक, अध्यक्ष श्री विकास कडू यांचे मनभरून स्तुती करताना म्हणाले की अशी आदिवासी वाडीत कामे करणारी उरण तालुक्यातील पहिलीच संस्था आहे. चाईल्ड केअर संस्था गेली पाच वर्ष गोर गरिबांना, विविध पद्दतीने मदतीचा हात देत आहे. त्या बद्दल संस्थे च्या सर्व सभासदाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
या कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री तृषार ठाकूर (भेंडखळ ) नारी शक्ती महिला ग्राम संघ भेंडखळ, सावित्रीबाई फुले महिला ग्राम संघ भेंडखळ, आणि सौ नीतिशा ओमकार पाटील यांचे सहकार्य लाभले. ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विकास कडू यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री विक्रांत कडू यांनी केले.
Comments
Post a Comment