ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नाम फाऊंडेशन कडून गोखले कॉलेज श्रीवर्धन साठी शैक्षणिक साहित्याची मदत

बोर्ली पंचतन (मुजफ्फर अलवारे) : श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात नाम फाऊंडेशन या नामांकित सामाजिक संस्थेकडून निसर्ग वादळामूळे झालेल्या हानी मधून पूर्ववत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्य ६ संगणक, ३ प्रिंटर, ३ प्रोजेक्टर मशीन तसेच भौतिकशास्त्र प्रयोगशाळा साहित्य महाविद्यालयास हस्तांतरित केले. 

हा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे शाखा सचिव प्रि. डॉ. एम. आर. मेश्राम यांनी नाम फाऊंडेशन चे संस्थापक प्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर व सिने अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच नामचे कोषाध्यक्ष राजीव सावंत यांचे ऋण व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा गौरव केला तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी प्राप्त झालेलं साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कामी उपयुक्त आहे असे प्रतिपादन केले. वरील सर्व साहित्य महाविद्यालयास प्राप्त करण्यासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य नितीन सुर्वे यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष प्रि. एस. बी. पंडित, सेक्रेटरी प्रि डॉ एम एस गोसावी सर झोनल सेक्रेटरी प्रि. एस. एस. संत व एच आर डायरेक्टर, प्रि. दिप्ती देशपांडे यांनी नाम फाऊंडेशन च्या कार्याचा गौरव केला.

Comments

  1. श्री.नानाजी पाटेकर.आणि नाम फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी वर्गाचे आपण केलेल्या शैक्षणिकसाहित्याचा मदतीसाठी कायम ऋणी आहोत.आपल्या अमूल्य सहकार्यसाठी धन्यवाद.
    आपल्या अतुलनीय कार्यास त्रिवार वंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog