खारकोपर रेल्वे स्थानकातील तिकीट काऊंटर त्वरीत चालू करावे आणि विविध मागन्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
छावा क्रांतिवीर सेनेची कौतुकात्मक कामगिरी
खारपाडा (सुरेश तांडेल) : खारकोपर रेलवे स्थानकात गेले अनेक दिवस पश्चिमे कडील तिकीट काऊंटटर बंद असल्यामुळे गव्हाण, नाव्हा, नाव्हा खाडी, शिवाजी नगर, सेक्टर ८,९ या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. हे छावा क्रांतिवीर सेनेच्या निदर्शनास आले असता या संघटनेने खारकोपर रेल्वे स्थानकातील व्यवस्थापक श्री. हेमंत कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधुन निवेदन पत्र दिले आणि सांगितले की आपण खारकोपर रेलवे स्टेशन मधील पश्चिमे कडील तिकीट काऊंटर त्वरीत चालू करवे आणि जनतेची होणारी गैरसोय दूर करावी याबाबतचे पत्र श्री. हेमंत गुप्ता रेलवे व्यवस्थापक यांच्या कडे दिले. पुढे विचारणा केली असता खारकोपर रेलवे व्यवस्थापक श्री हेमंत गुप्ता यांनी असे सांगितले की, आमच्याकडे पुरेसा स्टाफ नसल्यामुळे सदरचा टिकिट काऊंटर बंद आहे. नंतर पुढे या संघटनेने रेलवे स्टेशनची पाहणी केली. या पाहणीत अनेक समस्या निदर्शनात आल्या त्यामधे प्लॅटफॉर्मवर असलेला वॉटर प्युरीफाय व सुलभ शौचालय बंद स्थितीत आहेत. शिवाय रेल्वे कर्मचारी यांना पिण्याचे पाणी मिळत नसावे. याशिवाया तिकीट काऊंटरवर असलेली काच फुटलेली असून ही काच केव्हाही खाली पडून कुणाला ही दुखापत होऊ होऊ शकते.
तसेच स्थानिकांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे गाड्यांची वेळ बदलावी. सकाळी सुटणारी पहिली गाडी ही ६:५० वाजून सुटणारी आहे. तर् ती ५:४५ वाजता सुटावी आणि रात्रीची शेवटची 10 ची येणारी गाडी ही ११:३० ची असावी जेणेकरून सकाळ शिफ्ट मधील कामगार आणि दुसऱ्या शिफ्ट मधील कामगार वर्ग यांची गैरसोय होऊ नये. वेळापत्रकानुसार प्रत्येक गाडी ही दर ४५ मिनीटांनी येते तर त्यात बदल करून ती वेळ २० मिनिटांवर करावी. अशा अनेक समस्या निदर्शनात आल्या. मुंबईसारख्या विकसीत असनाऱ्या उरण शहरामधील प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत ते लवकरात लवकर रेल्वे प्रशासन आणि सरकार ने या मागण्याचा विचार करून छावा सेनेने जनते साठी केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात. अशी मागणी छावा क्रांतीवर सेनेकडून करण्यात आली आहे.
याप्रसंगी उलवे नोड अध्यक्ष श्री. नरेंद्र देशमुख, सचिव श्री. सुनील ठाकूर, सल्लागार श्री. भागीरथ कोळी, सदस्य श्री. विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment