माणगांवातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, एस टी कामगारांच्या मागण्या मान्य करा! - रमेश मोरे
साई/माणगांव (हरेश मोरे) : रायगड जिल्ह्यात दि ४ व ५ नोव्हेंबर रोजी अचानक पणे अवकाळी पाऊस पडल्यामुळे माणगांव तालुक्यातील शेतकरी बळी राजाचे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. तोंडात पडायला आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून त्यांची नासाडी केली आहे. शेतकऱ्यांच्या हाताला पेंडा सुध्दा उरला नाही अशी प्रतिक्रिया माणगांव तालुका शे. का. पक्षाचे सरचिटणीस रमेश मोरे यांनी माणगांव तहसिलदार प्रियंका आयरे यांना निवेदन देताना व्यक्त केली.
यावेळी माजी जि. प. सभापती अस्लम राऊत, कृषी बाजार समिती सभापती संजय पंदेरे, सुरव ग्रामपंचायत माजी सदस्य मधुकर अर्बन, डोगरोली ग्रामपंचायत माजी सरपंच संजय गायकवाड, मोर्बा ग्रामपंचायत माजी सरपंच विलास गोठल, नथुराम मोरे, विलास मोरे, वणी ग्रामपंचायत सरपंच मौझम बारामपुरे, तसेच शे.का.प.चे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तसेच माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून कोरोना तसेच निसर्ग चक्रिवादळ, अतिवृष्टी या निसर्ग संकटापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान प्रस्थापित सरकारला रमेश मोरे यांनी शेवटी सांगितले.
तसेच यावेळी राज्यभरा मध्ये एस टी महामंडळ कामगाराने आपल्या विविध मागण्यांसांठी संप पुकारलेला असून त्या संपाला माणगांव तालुका शे.का.प चे सरचिटणीस रमेश मोरे यांनी पक्षाकडू पूर्ण पणे पाठींबा दर्शवला आहे. तसेच त्यांनी माणगांव बस स्थानकात बसलेल्या एस टी कामगारच्या संपा मध्ये देखील सामील होऊन बोलताना सांगितले की गेल्या दोन वर्षे कोरोना असता देखील एस टी कामागारांने आपली जीवाची व परिवारांची परवा न करता दिवस राञ ते काम करत होते आणि अशा कर्मचाऱ्यांना आता सरकार त्यांच्या मागण्या साठी झुलवत आहे.
Comments
Post a Comment