माणगांव पुनाडे रोड जवळ बस चा भीषण अपघात!
माणगांव : सचिन पवार
माणगांव पासून काही अंतरावर असलेल्या माणगांव पुनाडे रोड वर रायगड वरून माणगांव दिशेकडे येणाऱ्या बस चा तीव्र उतार वळणावर अपघात होऊन एक मयत झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 26 नोव्हेंबर रोजी बस क्रमांक MH 04 AF 7799 ही रायगड वरुन माणगांव बाजूकडे येत असताना घरोसी वाडी ते कडापूर गावादरम्यान दुपारी 4 ते 5 दरम्यान बस पलटी होऊन हा अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर बस मधील जखमी झालेल्या प्रवाशांना माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर बसमधील प्रवासी हे कर्जत येथील असल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. या अपघातात वाहनचालक विजू भगवान नागरे वय वर्ष 24 यांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी, तर 18 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर बसमधील गंभीर जखमींमध्ये 9 स्त्रिया, 3 पुरुष, 6 मुले, 3 मुली तर किरकोळ जखमींमध्ये 2 पुरुष,10 स्त्रीया, 6 लहान मुले यांचा समावेश आहे, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे, तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोड ला लागून असलेल्या संरक्षण कठडयावर आदळून बस पलटी झाली! जर का संरक्षक कठडा नसता तर ही बस खाली कोसळून मोठा अनर्थ घडला असता!
Comments
Post a Comment