ग्रुप ग्रामपंचायत विंधने येथे चाललाय मनमानी कारभार
हुतात्मा आनंद माया पाटील यांच्या स्मारकात सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडून होत आहे मनमानी
हुतात्मा स्मारकात घेतले जात आहेत जीव घेणे शिक्षणाचे धडे, मुलांच्या जिवाशी खेळून वर्ग भरवले जातात
खारपाडा : सुरेश तांडेल
हुतात्मा आनंद माया पाटील हे स्वतंत्र सेनानी असून सरकारने त्यांच्या नावे गावाच्या वेशीवर स्मारक उभारले आहे. या स्मारकाची अवस्था तिथला परिसर एकदम गलिच्छ प्रकारचा झालेला असून, त्या स्मारकामध्ये मुलांना शिकवण्यासाठी वर्ग भरवले जातात. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे साप त्या वर्गामध्ये/स्मारकात आढळतात. ग्रामपंचायत त्या स्मारकाकडे गेली कित्येक वर्षे दुर्लक्ष करीत आहे. त्या स्मारकाच्या अवतीभवतीची मोकळ्या जागेवर गाववाल्यांनी मनमर्जीने अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमणे केली आहेत. वरून ग्रामपंचायत ही त्या स्मारकातील असलेल्या जागेवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता दुसऱ्या सरकारी जागा सोडून स्मारकाच्या जागेवर विकासाच्या नावाने अतिक्रमण/ अनधिकृत बांधकामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधत आहे व हुतात्मा आनंद माया पाटील यांचे वारस धाकटी जुई या गावात राहत आहेत यांना दमदाटी करणे, पाणीपट्टी भरली असूनही वारसदार व त्यांच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना महिनाभर पाणी न देणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हुकुमशाही ने हुतात्मा त्यांच्या वारसांना व गावकऱ्यांना त्रास देत आहेत.
हुतात्मा आनंद माया पाटील यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष असून त्या स्मारकाची इमारत एकदम गलीच्छ स्वरूपाची झाली असताना ग्रामपंचायत मुलांच्या जीवाशी खेळून शिक्षणाचे वर्ग घेत आहे.
छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन पवार, छावा क्रांतिवीर सेनेने पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवूनही ग्रामपंचायत स्वतःची मनमानी करताना दिसत आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता स्मारकाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणार असाल, हुकूमशाही/ मनमानी कारभार आत्ताच थांबवा नाही तर ग्रुप ग्रामपंचायत विंधने सरपंच व सदस्य यांच्या विरोधात आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा ईशारा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment