ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

श्री काळभैरव देवस्थान मुगवली जयंती सोहळा उत्साहात संपन्न

माणगांव : सचिन पवार

श्री काळभैरव देवस्थान मुगवली हे गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर तळेगाव गावाच्या हद्दीवर आहे. फाल्गुन महिन्यातील होळीचा उत्सव परंपरेनुसार बालगोपाळांसह पाच दिवस याच मंदिरात साजरा केला जातो. श्री काळभैरव हे जागृत देवस्थान आहे. अनेक वर्षे पूर्वजांपासून, गावातील कोणत्याही व्यक्तीस सर्पदंश झाल्यास त्याला दवाखान्यात न नेता ताबडतोब श्री काळभैरव मंदिरात नेले जाते. तेथे कोणत्याही प्रकारे औषधोपचार न करता श्री काळभैरवनाथ यांची पुजा करून त्याला साकडे घालून विनवणी केली जाते. दिवसभरातील 24 तासानंतर ती व्यक्ती पूर्णतः बरी होऊन घरी जाते. ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर परिपूर्ण श्रद्धा आहे! या भावनेतून श्री काळभैरव देवस्थानाची प्रसिद्धी आहे. भाद्रपद मासी श्री गणेश चतुर्थी कालावधीत श्री गौरी मातेचे आगमन होते त्यावेळी श्री काळभैरव मंदिरातूनच गौरी मातेचे आगमन आवाहन केले जाते. त्यावेळी बरोबर गावातील महिला मंडळ, लहान मुली-मुले फार उत्साहात आनंदाने या सोहळ्यात सहभागी होतात. कार्तिक कृष्ण 7 या तिथीला श्री काळभैरव जयंती येते. 

हा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाने मुंबईकर मंडळाचे उपस्थिती साजरा केला जातो. पंचक्रोशीतील लोक, भाविक भक्त या सोहळ्यात उपस्थितीत राहून तीर्थ प्रसादचा लाभ घेतात तसेच प्रतिवर्षी अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत दिवा लावून रोषणाई केली जाते व हरिजगार केला जातो. तसेच प्रतिवर्षी छोटे-मोठे कार्यक्रम श्री काळभैरव देवस्थानात साजरे केले जातात.

Comments

Popular posts from this blog