छावा क्रांतीविर सेनेने केलेल्या रणासई ते बालगंगा रस्ता दुरुस्ती निवेदन पत्राला यश
छावा क्रांतीविर सेना महाराष्ट्र राज्य सेनेच्या निवेदन पत्राची शासन दरबारी दाखल घेऊन राणसई ते बालगंगा नदी पर्यंत (मयनी - तळदेव - ढेण)रस्त्याची केली तातडीने दुरुस्ती
खारपाडा : सुरेश तांडेल
छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य सेनेच्या निदर्शनास आले की, रानसई ते बाळगंगा नदीपर्यंत (मयनी - तलदेव - ढेणे) असलेला रस्ताची खुप दुरावस्था झाली आहे. गेले ५ ते ६ वर्षे या रस्त्याची दुरुस्ती ही केली गेली नाही. सदरच्या रस्त्याचा वापर करत असताना येथे राहणाऱ्या सामान्य मनसला, नागरिकांना, वृद्धांना तसेच रुग्णांना सदर रस्त्यावरून ये-जा करत असताना खुप त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याची तातडीने डांबरीकरण करून दुरुस्ती होणे अत्यत गरजेचे होते.
तरी रानसई ते बाळगंगा नदीपर्यंत ह्या रस्त्याचे तातडीने खडीकरण डांबरी करण करून दुरुस्त होन्या साठी आवश्यक ती कारवाई व्हावी यासाठी छावा क्रांतिवीर सेनेने रा.जि.प. मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्याकडे धाव घेतली.
छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य सेनेतर्फे पेण पूर्व विभाग रानसई ते बाळगंगा नदीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना पत्राद्वारे स्वतः भेट देऊन दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी कळवण्यात आले होते. त्यावेळी छावा क्रांतिवीर सेना पेण तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, पेण पूर्व विभाग अध्यक्ष संजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती होईल असे आश्वासन शासकीय अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निवेदन पत्राची शासन दरबारी दखल घेऊन १ डिसेंबर रोजी रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली.
गेल्या चार महिन्यात असे एकही काम नाही जे छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण केलेले नाही. हे छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचे मोठे यश आहे.
Comments
Post a Comment