मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

थर्टीफस्टला पर्यटकांची देवकुंड, विळा, साजे, रवाळजे परिसराला मोठी पसंती

कोरोनाचे नियम न पाळल्यास कडक कारवाई - पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना ओमायक्रॉन या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे यावर्षी देखील थर्टीफस्ट हा दिवस घरातच साजरा करण्यास भाग पडणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यात माणगांव तालुक्यात देवकुंड, साजे, रवाळजे, विळा या जंगलमय परिसराला मुंबई, पुणे या शहरातील पर्यटकांची मोठी पसंती दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मिळत असून मोठ्या प्रमाणात तंबुंची ऑनलाईन बुकींग चालू असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच माणगांव तालुक्यात थर्टीफस्ट बंदोबस्त विषयी नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे याविषयी माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांना विचारले आसता त्यांनी  बोलताना सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोणा हा प्रादुर्भाव चालूच आहे. तसेच आता परत ओमायक्रॉन या आजाराचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात काही भागात कमी प्रमाणात जरी असला तरी त्यासंदरिभात प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे ३१ डिसेंबर २०२१ रोजी माणगांव तालुक्यातील हॉटेल, लॉजीग, फार्म हाऊस तसेच भिरा, पाटणूस मधील देवकुंड, विळा सिक्रेट प्लेस, साजे, रवाळजे हा परिसर जंगल निसर्गमय असून या परिसरात राप्टींग होत असून नदीकाठी काही भागात फार्म हाऊस तसेच जंगलात काही तरूण मंडळी थर्टीफस्टच्या निमित्ताने पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकींग करून डीजे, विदेशी मद्याच्या पार्ट्यांचे आयोजन करीत असतात. 

या पार्ट्यांवर देखील माणगांव पोलिसांची यावेळी करडी नजर राहणार असून जर कुणी शासनाने लागू केलेले कोरोना ओमायक्रॉन विषयी नियम न पाळल्यास त्या व्यक्तीवर तसेच पार्ट्या आयोजकांवर कडक कारवाई केली जाईल असे माणगांवचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी शेवटी बोलताना सांगितले. 

Comments

Popular posts from this blog