ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा - संजय भोईर 

बेणसे : चंद्रकांत अडसुळे

भारताच्या नवनिर्मितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमधुन त्यांचे हे श्रेष्ठत्व प्रमाणित होते. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रादेशिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विवीधता मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला एक संघ ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने होत आहे. म्हणून प्रत्येक समाजाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले दैनंदिन कार्य करावे असे प्रतिपादन पेण पंचायत समिती माजी सभापती संजय भोईर यांनी 6 डिसेंबर रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त  नालंदा बुध्दविहार सिध्दार्थनगर बेणसे, ता. पेण येथे आयोजित अभिवादन सभेत बोलताना केले. 

या सभेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीत लढवय्ये नेतृत्व व समाजसेवक चंद्रकांत पांडुरंग अडसुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेणसे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष अडसुळे, माजी सरपंच अ.का.म्हात्रे, शिवसेना विभागीय नेते अशोक भोय, नागोठणे पोलीस स्टेशनचे हवालदार पी. एन. कदम, विजय येटम, सहदेव भगत, सुरेश भगत सावित्रीबाई बचतगटाच्या अध्यक्षा सोनाली शिंदे, सचिव पुजा अडसुळे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्व सर्व व्यापक असून त्यात सामाजिक न्यायाची भूमिका सातत्याने आधोरेखीत होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घटना, त्यांची प्रतिमा यांचे पुजन प्रत्येक नागरिकांनी घरोघरी करावे असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून व दीपप्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी अ.का.म्हात्रे, अशोक भोय, चंद्रकांत अडसुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नंदाबाई अडसुळे माजी सदस्या माधुरी अडसुळे, छाया सावंत, पुनम सावंत, कविता अडसुळे, आम्रपाली सावंत, धर्मिबाई अडसुळे, सुवर्णा भगत, आरती भगत, लिला येटम, अमृता शिंदे, तेजस्विनी सावंत, सितल मोहिते, आदिनाथ अडसुळे, अमित शिंदे, प्रज्ञशिल सावंत, योगेश अडसुळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आदित्य भगत यांनी केले.

Comments

Popular posts from this blog