ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नेहरू युवा केंद्र अलिबाग रायगड यांच्यातर्फे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा

माणगांव : सचिन पवार

आज  दि.१० जानेवारी २२रोजी झालेल्या माणगांव निजामपूर रोड येथील क्रिडासंकुलात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी माणगांव, कोलाड, रोहा, म्हसळा तसेच श्रीवर्धन येतुन करिअर अकॅडमी येथून आलेल्या विध्यार्थ्यांनी उत्तम अशी मेहनत घेतली. यावेळी नेहरू युवा केंद्र अलिबाग येथून आलेल्या आयोजकचे स्वागत करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. धावणे, गोळफेक अशा मध्ये मुळे व मुलींनी उत्तम अशी स्पर्धा जिकूंन सर्वांचे मने जिकंली. यावेळी माणगांव कमांडो करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धावणे व गोळफेकमध्ये बाजी मारली.1600 मीटर मध्ये कु. लतेश दत्ताराम वाझे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय क्रमांक प्रतीक नाक्ती, तृतीय क्रमांक दीपेश्वर शिंदे तसेच 800  मीटर मध्ये चंदना गायकवाड हिने तृतीय क्रमांक, 200 मीटर मध्ये गणेश लहाने ह्यांनी द्वितीय क्रमांक, 100 मीटर मध्ये कौशल कठे प्रथम क्रमांक व वैष्णवी माळी हिने द्वितीय क्रमांक मिळवीला. त्याचप्रमाणे गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी माळी, द्वितीय क्रमांक नीता घाणेकर ह्यांनी पारतोषिक तसेच ट्रॉफी जिंकून माणगांवकरांची मने जिंकली यावेळी उपस्थित असणारे नेहरू युवा केंद्राचे आयोजक प्रसाद सर, सायली सुतार, त्याचप्रमाणे माणगांव येतून निवास साबळे सर, परेश कोटकर, सागर कोतुर्डे, प्रितेश वाडकर ह्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog