मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

काकल ग्रामपंचायतीत कोरोना व ओमायक्रोन बाबत जनजागृती

साई/माणगांव : हरेश मोरे

माणगाव तालुक्यातील काकल ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वाडी वस्तीमध्ये कोरोना व ओमायक्रोन याचे संक्रमण वाढू नये याकरिता ग्रामपंचायती द्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

यावेळी काकल ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग मोरे यांनी ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून नऊ वाड्यांत कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून प्रतिबंधक उपाय असलेले मास्क लावणे, सॅनिटाईजर वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे याबाबत जनजागृती केली.

या जनजागृती मोहिमेत उपसरपंच श्रीकांत जाधव, माजी उपसरपंच गणेश गायकवाड, बळीराम लाड, किसन महाडिक, दगडू महाडिक, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग मोरे, शिपाई पांडुरंग जाधव, विजय सावंत, सरिता लाड,अनंत लाड ,पांडुरंग लाड,आशा सेविका, दत्तात्रय गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. तसेच या मोहिमेला प्रत्येक वाढीमध्ये लोकांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog