ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

माणगांव नगरपंचायत निवडणूकीमध्ये माणगांव विकास आघाडीची सत्ता

माणगांव : सचिन पवार

रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात मानगांव नगरपंचायतीचे एकूण १३ जागांसाठी मतदान दिनांक २१ डिसेंबर रोजी घेण्यात आले तर ओबीसी आरक्षण अनारक्षित झालेल्या उर्वरित चार जागांसाठी चे मतदान दिनांक १८ जानेवारी रोजी घेण्यात आले. या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस व भाजप अशी माणगांव विकास आघाडी, तर तर शेकाप राष्ट्रवादी अशी खरी लढत दिसून आली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ०३ उमेदवार रिंगणात होते तर ०३ उमेदवार अपक्ष लड़वित्त होते असे १७ जागांसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते या निवडणुकीत मतमोजणी १९ जानेवारी रोजी माणगाव मध्यवर्ती प्रशासकीय भवन सभाग्रहात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी कथा प्रांत अधिकारी प्रशाली देगावकर जाधव नगरपंचायत निवडणूक मुख्याधिकारी राहुल इंगळे व पोलीस प्रशासन चौक बंद बंदोबस्तामध्ये ही मतमोजणी घेण्यात आले यावेळेस माणगाव नगरपंचायत निवडणूक २०२१- २२ मध्ये माणगाव विकास आघाडी चे ०९ उमेदवार तर शेकाप राष्ट्रवादी चे आठ उमेदवार विजय झाले आहेत प्रभाग वाढ चे विजयी उमेदवार खालील प्रमाणे

प्रभाग ०१  लक्ष्मी चंद्रकांत जाधव राष्ट्रवादी विजयी, प्रभाग ०२ सुविधा संतोष खैरे राष्ट्रवादी विजयी, प्रभाग ०३ आनंद शिवराम यादव राष्ट्रवादी विजयी, प्रभाग ०४ ममता कुंडलिक थोरे शेकांप विजयी,प्रभाग ०५ राजेश गोकुळदास मेहता माणगाव विकास आघाडी विजयी,प्रभाग ०६ हर्षदा सुमित काले राष्ट्रवादी विजयी, प्रभाग ०७ सुशीला शिवाजी वाढवल राष्ट्रवादी विजयी, प्रभाग ०८ नंदिनी नितीन बामुगड़े मा.वि.आ. विजयी, प्रभाग ०९ रश्मी सागर मूढ़े राष्टवादी विजयी,  प्रभाग १० रिया रत्नाकर उभारे राष्ट्रवादी विजयी प्रभाग ११ कपिल नरेंद्र गायकवाड माणगांव विकास आघाडी विजयी, प्रभाग १२ अजित चंद्रकांत कार्लेकर माणगाव विकास आघाडी विजयी प्रभाग १३ शर्मिला सोभन सुर्वे माणगाव विकास आघाडी विजयी, प्रभाग १४ सचिन मारुती बोंबले माणगांव विकास आघाडी विजयी प्रभाग १५ प्रशांत अशोक साबळे माणगांव विकास आघाडी विजयी प्रभाग १६ ज्ञानदेव मारुती पवार माणगांव विकास आघाडी विजयी, प्रभाग १७ दिनेश बाळकृष्ण रातवडकर माणगांव विकास आघाडी विजयी, अशाप्रकारे माणगांव नगरपंचायत एकूण १७ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ०७ माणगांव विकास आघाडी ०९ व  शेकाप ०१ अशा जागा निवडून आल्या.

Comments

Popular posts from this blog