माणगांवमध्ये स्वराज्य सह्याद्री ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी
माणगांव : सचिन पवार
माणगांव तालुक्यात स्वराज्य सह्याद्री ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहत साजरी करण्यात आली. या संस्थेने शिवज्योत पेटवून किल्ले रायगड महाड़ शिवाजीचौक ते माणगांव अशी शिवज्योत मिरवणूक काढली. यावेळी माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सौ. अंजली ज्ञानदेव पवार व आरोग्य व क्रीडा समिती नगरसेवक अजित तार्लेकर तसेच सर्व मान्यवरांनी शिवज्योतीचे स्वागत केले.
याप्रसंगी स्वराज्य सह्याद्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार व त्यांचे सहकारी अक्षय खरुसे, साहिल बोडेरे, प्रदीप पवार, संदीप रेके, अनिकेत कांबळे, सुजित देशमुख, सतिश पवार, प्रणित सोनावले, सौरभ पवार, चेतन शेलार, आनद बारगे, दत्ता सुतार, विक्रांत भादावकर, नीरज शेलार, संजोग पवार, अनिकेत तेटगुरे, आदिनाथ पवार, अभी लांगे तसेच सर्व शिवमावळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिवजयंती साजरी केली. प्रत्येकाच्या घराघरात शिवजयंती साजरी होवी हीच आमची इच्छा असे स्वराज्य सह्याद्री ग्रूपच्या शिव मावळ्यांनी सांगितले.
स्वराज्य सह्याद्री ग्रुप ने शिवज्योत मिरवणूक बाजारपेठ, वाकडाई मंदिर ते बालाजी कॉम्प्लेक्स ते अशोकदादा साबळे विद्यालय अशी काढली. याप्रसंगी राष्टीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भूषण शिसोदे, कोकण उपाध्यक्ष राजू सुतार, तालुका संघटक राजेंद्र भूरभे तसेच सुधाकर नारायण शिपुरकर स्कूलच्या प्रिंसीपल सौ. मनीषा मोरे, तसेच शिक्षणकेतर कर्मचारी यांनी शिवज्योतीच स्वागत केले. यावेळी स्वराज्य सह्याद्री ग्रुपच्या मावळ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment