मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

इंदापूर नगरोली कालवा रस्त्याची दुरावस्था,

अपघात होण्याची शक्यता - वैभव गायकवाड 

वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव

इंदापूर ते नगरोली कालवा रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे या रस्त्याकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष केला असून.हा रस्ता दोन कि.मी. अंतर आहे. नगरोली, माकटी या गावातील विद्यार्थी हे इंदापूर या ठिकाणी हायस्कुल, कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी या कालवा रस्त्यानेच येत असतात. तसेच या गावातील ग्रामस्थ देखील इंदापूर या ठिकाणी बाजारपेठत, वैद्यकीय उपचारासाठी नेहमी ये जा करीत असतात.

हा रस्ता एवढा अरुंद व खड्डेमय झाला असून विद्यार्थी किवा वयोवृध्द व्यक्ती कालव्याच्या पाण्यात पडून जिवित हानी या दोन कि.मी.च्या अंतरामध्ये होऊ शकते याकडे पाटबंधारे विभाग वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचं आहे. कालव्याची सुद्धा अनेक वर्षे साफसफाई होत नाही. या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला, भातशेती तसेच विविध पिके घेत असतात. परंतु अति महत्वाचे काम असले तर इंदापूर या ठिकाणी जायचं असेल तर खाजगी वाहने सुद्धा या रस्त्यावरून येत नाही. लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता रस्ता डांबरीकरण करावा व अपघात टाळावा असे इंदापुरचे सामाजिक कार्यकर्ते वैभव गायकवाड तसेच इंदापुरकर नगरोली लोकांची मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog