आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते अशोक नगर किल्ला येथे विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा संपन्न
रोहा : अक्षय जाधव
आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभ हस्ते अशोक नगर किल्ला, ता.रोहे येथे ता.१८ रोजी विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
कोकणचे भाग्यविधाते खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशिर्वादाने व रा.जि.पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या विषेश प्रयत्नातून विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते जल जीवन नळ पाणीपुरवठा व समाज कल्याण विशेष घटक अंतर्गत जल शुद्धीकरण बसविणे व गाव अंतर्गत गटारात बांधणे आदी विकास कामांचे भूमीपूजन समारंभ संपन्न करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ. अनिकेतभाई तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस जि.कार्याध्यक्ष मधुकर पाटील, राज्य सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, तहसिलदार कविता जाधव, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव भगत, तालुका उपाध्यक्ष अनिलजी भगत, ज्येष्ठ नेते प्रदीप बामुगडे, धाटाव उपसरपंच यशवंत रटाटे, विभागिय अध्यक्ष दत्ता चव्हाण, ज्येष्ठ नेते अप्पा देशमुख, तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, प्रितमताई पाटील वरसे ग्रा. पं. सरपंच नरेश पाटील, वाशी ग्रा. पं उपसरपंच अरविंद मगर, अमित मोहीते, गुणाजी पोटफोडे आदी प्रमुख पाहुण्यांसह युवा नेते महेश बामुगडे, रूपेश बामुगडे, अजय बामुगडे, दिनेश मोरे, उपसरपंच राकेश बामुगडे, सदस्य दिपक जमदाडे, नरेश चांदोरकर, समीर वाळंज, माधुरी लोखंडे, सानिका मुंढे, जयवंती बामुगडे, यशवंत कडव, शिवाजी रटाटे, राकेश चांदोरकर, सौरभ चांदोरकर, प्रकाश चांदोरकर, सुनिल जाधव, सुदेश पालकर, मुकेश चांदोरकर, जयेश पुगावकर, गौरव पाबरेकर, संकेत पालकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांनी लांढर-धाटाव विभागाच्या विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध असून किल्ला अशोक नगर येथील समाजमंदिर सभागृह, अंतर्गत रस्ते तसेच अन्य विकासकामे लवकरच मार्गी लागतील असे अभिवचन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. पं. सदस्य नरेश रमेश चांदोरकर यांनी केले. तर सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे सर यांनी केले.
Comments
Post a Comment