अखेर दिपकशेठ जाधव यांच्या मध्यस्थीने भूवन बौद्धवाडी रस्त्याचा वाद संपुष्टात
वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव
माणगाव तालुक्यातील इंदापुर विभागातील भूवन बौद्धवाडी व आदिवासी वाडीचा गेल्या अनेक वर्षापूर्वीचा रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करून हा मार्ग अडवण्यात आला होता. याविषयी भुवन बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांनी माणगांव पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना सदरचा रस्ता खुला करण्यासाठी निवेदन दिले होते. पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन मंगळ वार दि २२ फेब्रुवारी रोजी भुवन ग्रामपंचायत कार्यलयात मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये भुवन बौध्दवाडीतील ग्रामस्थ, मुंबईकर तसेच शेतकरी अरुण वालुगडे यांचे म्हणणे एकूण घेतल्यावर दीपकशेठ जाधव युवक सचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र यांनी मध्यस्ती करून या रस्त्याचे तक्रारी ग्रामस्थ शेतकरी यांना घेऊन घटना स्थळी जाऊन ही वादाची समस्या दूर केली. यावेळी माणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच दिशा जाधव, सदस्य नितीन शिर्के, भास्कर यादव जोत्स्ना वाळूगडे, ग्रामसेवक राकेश मोरे, नामदेव राव, शुक्रदास मोरे, संतोष मोरे, विजय मोरे, राजेंद्र मोरे, संतोष म्हस्के, राजेश म्हस्के, रोहित म्हस्के, अरुण वालुगडे, प्रवीण म्हस्के, मोहन म्हस्के, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बौध्दवाडीत जाणाऱ्या विद्युत तारा या झाडांच्या मधून गेल्या आहेत. त्यासुद्धा तोडण्याचा निर्णय यावेळी या सभेत घेण्यात आला आहे.
Comments
Post a Comment