मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

इंदापूर येथे बँकांची एटीएम सेवा बंद, ग्राहकांची प्रचंड गैरसोय!

वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव

माणगांव तालुक्यात अनेक बँकांची एटीएम सेवा असून कोलमडत चालली असून लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशाच प्रकारे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर हे शहर वसलेले असून मुंबई, ठाणे, पुणे या शहरातून अनेक पर्यटक कोकणात तसेच श्रीवर्धन, हरिहरेश्रवर,मुरूड जंजीरा या ठिकाणी जाण्यासाठी येतात व ते इंदापूर शहरात उतरत असतात. परंतु काही वेळेला इंदापूर मधील राष्ट्रीयकृत बँकेची एटीएम सेवा बंद असते त्यामुळे ग्राहक नाराज होतात. इंदापूर शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडीया, कोटक महिंद्रा बँक, तसेच आर डि सी बँक असून ग्राहकांना या बँकेतून सेवा मिळत असते. परंतु अनेक दिवसांपासून इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे बँकेच्या कामासाठी आलेले ग्राहक निराश होऊन घरी जात आहेत. ग्राहकांचे पैसे बँकेत असून सुद्धा ते तातडीच्या कामासाठी मिळू शकत नाही हे ग्राहकांचे दुर्दैव झाले आहे. 

परिणामी बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी ग्राहकांना योग्य सेवा मिळावी याकरिता या गंभीर समस्येकडे तातडीने कडे लक्ष द्यावे अशी मागणी इंदारपूर विभागातून जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog