ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पंकज तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सणसवाडी ग्रामस्थांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव

माणगांव तालुक्यात काँग्रेस पक्ष प्रवेशाचा झंझावात काही दिवसा पासून जोरदार पणे चालू झाला असून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माणगांव तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थ तसेच युवा तरूण हे निसंकोच पणे काँग्रेस पक्षात येऊन जाहिर रित्या पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत.अशाच प्रकारे निजामपूर विभागातील सणसवाडी येथील काही ग्रामस्थांनी रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पंकज तांबे यांचे निवासस्थान  विभारज कॉटेज माणगांव येथे येऊन  जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी सणसवाडी येथील माजी उपसरपंच परशुराम नलावडे, सयाजी नलावडे, गणेश नलावडे, संजय नलावडे, मुकेश नलावडे, श्रीकांत डिगे, मनोहर डिगे, रवींद्र डिगे, प्रवीण नलावडे, अल्पेश म्हस्के, गणेश मोरे, हनुमंत मोरे, मनोहर नलावडे, मंगेश नलावडे, शहाजी पवार, विश्वनाथ जाधव यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. 

या पक्ष प्रवेश वेळी रायगड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, माणगांव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे निजामपूर विभागीय अध्यक्ष स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजीम बंदरकर यांची मोर्बा विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच सयाजी नलावडे यांची पाटणुस विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पक्ष प्रवेश कार्यक्रमा निमित्त काँग्रेस पक्षाचे बहूसंख्य लोक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog