ठोंबरे आणि गोनबरे "परिवाराने केला "सत्यशोधक पध्दतीने विवाह" बहुजन समाजापुढे ठेवला एक ऐतिहासीक आदर्श
वावेदिवाळी/इंदापूर : गौतम जाधव
रविवार,दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील वांजळोशी या गावचे सत्यशोधक "प्रदीप" आणि सत्यशोधिका "संध्या" या दोन्ही उभयत्यांनी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज यांचे शिष्य व विचारांचे खरे वारसदार, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून, जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे "राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले" यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्यशोधक विवाह करून प्रस्थापित व्यवस्था व त्यांच्या फसव्या तकलादू रिती - रीवाजांना, कर्मकांडाला नाकारले आणि सर्व विधी हा सत्यशोधक पद्धतीने करून बहुजन समाजाच्या विस्मरणात गेलेल्या मातृसत्ताक पद्धती ची आठवण सर्व बहुजन समाजाला करून दिली.
सदर विवाहापूर्वी "इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो"अशा महान सम्राट बळीराजा,राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर"यांच्या प्रतिमाना अभिवादन केले आणि सत्यशोधक विवाह सोहळा समारंभास सुरुवात करुन प्रथम "सत्यशोधक विवाह म्हणजे काय..? सत्यशोधक विवाह आणि इतर विवाहातील मूलभूत आणि वैचारिक फरक कोणता..? महापुरुषांनी या सत्यशोधक विवाह परंपरा पर्याय म्हणून का दिला..? आज या सत्यशोधक विवाह पद्धतीची गरज का आहे..?याविषयी ॲड.उत्तम कोळेकर सर (प्रभारी,मौर्य क्रांती संघ कोकण विभाग) यांनी उपस्थीत जन समुदायाला संबोधित करुन त्यांच्यात नवचैतन्य आणि उत्साह निर्माण केला.त्यानंतर या सत्यशोधक विवाह चा विधी "ह.भ.प. दादा महाराज पाटील पनवेलकर" (अध्यक्ष, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी साधू संत संघ, महाराष्ट्र राज्य) यांचे हस्ते करण्यात आला.
सदर सत्यशोधक विवाह करणारे "प्रदीप ठोंबरे आणि परिवार तसेच वांजळोशी गावातील ग्रामस्थ, युवा, युवती कार्यकर्ते हे गेले अनेक वर्षांपासून तळागाळातील बहुजन समाजाला जागृत करून या देशामध्ये "शिवराय - फुले- शाहू- आंबेडकर" यांच्या स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय"या तत्वांवर आधारित व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. यासाठी तन मन धनाने "भारतीय विद्यार्थी,युवा मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा"या राष्ट्रव्यापी संघटनेमध्ये काम करत आहेत.
हा सत्यशोधक विवाह संपन्न करतांना सत्यशोधक "प्रदीप" आणि सत्यशोधीका "संध्या" तसेच त्यांचा ठोंबरे आणि गोणबरे परिवार" त्यांचे सर्व नातेवाईक, सदस्य या ऐतिहासीक विवाह सोहळा "याची देही|याची डोळा|" पाहण्यासाठी आनंदात होते. त्यांनी सर्व प्रथम तळा तालुक्यातील ९६ वाडी वस्तीतील नातेवाईक तसेच सर्व समाजातील बांधवापर्यत, मुंबई, महाराष्ट्रात काही जिल्ह्यात सोशल मीडिया द्वारे या विवाह सोहळा ची ऐतिहासिक पत्रिका सुद्धा पोहचवली होती. या पत्रिकेतील संदेश वाचून बहुजन समाजा मध्ये एक परिवर्तन आणि भविष्याप्रती दूरदृष्टिकोन निर्माण केला आहे. आपल्या ओबीसी सह संपूर्ण बहुजन समाजाच्या या दयनीय अवस्थेला जबाबदार या भारत देशातील अनियंत्रित व्यवस्था कशी आहे..? आजही आपल्या देशावर कुणाचे वर्चस्व आहे, हा लग्न पत्रिकेतून संदेश दिला. ही पत्रिका संपूर्ण भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत पोहचली. विदेशातून कार्यकर्त्यांनी त्यांना,कार्यकर्त्यांना फोनद्वारे, सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. या सत्यशोधक विवाह सोहळा चे माध्यमातून अन्नाची होणारी नासाडी कशी टाळावी..? यासाठी तांदूळ फेकण्याऐवजी फुलांचा अक्षदा म्हणून वापर केला, त्याच बरोबर विविध वैदिक कर्मकांड नाकारले. आहेर म्हणून "बळीराजा पुस्तक" भेट स्वरुपात देण्यात आले. "निर्मिक व मानव" यांच्यामध्ये ईश्वराच्या नावाने बहुजनांची लूट करणाऱ्या दलालांचा बंदोबस्त कसा करावा..? तसेच आपल्या महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याशिवाय बहुजनांना दुसरा पर्याय नाही. हा संदेश संपूर्ण बहुजन समाजाला दिला... या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित लोकांना सगळ्या सत्यशोधक मंगल अष्टकांचा अर्थ व्यवस्थित व ठळकपणे समजत होता. कारण सर्व विधी मराठी भाषेतून करण्यात आली, त्यामुळे लोकं म्हणत होते की गेल्या अनेक वर्षे आम्हाला लग्न विधी काय बोलतात..? त्या मंगल अष्ठकांचं अर्थ काय हे कळलेच नाही. आज पहिल्यांदा इथे सर्व समजले. इथून पुढे असेच विवाह सोहळे बहुजन समाजात आयोजित करू अशी चर्चा देखील या ठिकाणी होती.या ऐतिहासिक सत्यशोधक विवाह सोहळा साठी सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण मित्र मंडळ वांजळोशी, ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, सदस्य कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटन भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, शिवकन्या ग्रूप, तळा तालुका कुणबी समाज सर्व ग्रूप, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन,नवी दिल्ली, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन,नवी दिल्ली, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी साधू संत संघ, बुद्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, समता सेवा संघ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा रायगड जिल्हा, भारतीय बौद्ध महासभा, ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील कर्मचारी बांधव तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ति पार्टी अशा सर्व राजकीय संघटनांचे पदाधिकारी त्यांचे दिग्गज कार्यकर्ते मुंबई,ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून उपस्थित होते. सदर सत्यशोधक विवाह सोहळा हा ऐतिहासिक असल्याने संपूर्ण परिसरात एकच चर्चा होत आहे.
Superb
ReplyDelete