उसर कोंड ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
साई/माणगांव : हरेश मोरे
माणगांव तालुक्यातील उसर कोंड गावातील ग्रामस्थ यांनी 19 मार्च रोजी खा. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेन रहाटविलकर यांच्या निवासस्थानी जाहीर प्रवेश केला.
साई गावचे काळभैरव मंदिर या ठिकाणी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी खा. सुनिल तटकरे या पूजेला उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उसर कोंड ग्रामस्थ यांनी शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना या पक्षाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
उसर कोंड येथील विजय सावंत, अशोक सावंत, नारायण घोसाळकर, सूर्यकांत सावंत, सुभाष घोसाळकर, शरद सावंत,सचिन पालांडे, अनंत घोसाळकर, शरद घोसाळकर, सुधीर घोसाळकर, दर्शन सावंत, मधुकर सावंत, पंकज भुवड, रघुनाथ पातेरे, सचिन भुवड या ग्रामस्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव बक्कम, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, माणगांव तालुका महिला अध्यक्षा संगीता बक्कम, साई ग्रामपंचायत सरपंच हुसेन रहाटविलकर, उपसरपंच प्रकाश धुमाळ, अब्दुल्ला कोंडविलकर, सईद दळवी व प्रवीण अधिकारी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment