मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचेनेनुसार इंदापुर येथे कातकरी उत्थान अभियान कार्यक्रम 

वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव

जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या सूचनेनुसार माणगांवच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर आणि माणगांव तहसीलदार प्रियांका कांबळे यांच्या मार्गदर्शना नुसार आज इंदापूर येथे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. समाजातील मागासलेल्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन हा कार्यक्रम राबवित आहे यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते त्यातून त्या योजनांसाठी पात्र असणारे लाभार्थी शोधले जातात आणि त्यांना त्या योजनांचा लाभ दिला जातो. तसेच आदिवासी बांधवांच स्थलांतर रोखणे त्यासाठी शासन चा महसुल विभाग सर्वदिप विकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे./या अंतर्गत प्रत्येक कातकरी वाडीवर जाऊन सर्वे करण्यात आला व विविध योजनापासू वंचित असलेले लाभार्थी शोधण्यात आले या कामी संस्थेचे मा महेश मोरे, काणेकर मॅडम, मोरे मॅडम, या कार्यकर्त्यांची मदत झाली. या अंतर्गत तसेच इंदापूर मंडळाचे मंडळ अधिकारी विश्वास गडदे, तलाठी समीरा खाडे, साले तलाठी ज्योत्स्ना शिंदे, प्रियांका वांगे, अमित उजगरे तात्या, विशाल वाघमारे तात्या, इंदापूर विभागातील सर्व तलाठी उपस्थित होते तसेच इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातीला डॉ.रोषणी, आदिवासी विकास विभाग पेण येथील निरीक्षक उपस्थित होते. यामध्ये इंदापूर ८ भागातील सर्व कातकरी बांधव उपस्थित होते. 

तरी आज या कार्यक्रमा अंतर्गत कातकरी बांधवाना  १६ जातीचे दाखले, १० उत्पन्नाचे दाखले, १० वयाचे दाखले २७ आधार कार्ड १७असे फॉर्म भरण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog