प्रख्यात कवी शाहीर गोविंद शिंदे यांना रायगड भुषण पुरस्कार
वावेदिवाळी/इंदापुर : गौतम जाधव
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा मानाचा रायगड भुषण पुरस्कार हा यावर्षी माणगांव तालुक्यातील इंदापुर या विभागातील विठ्ठलनगर गावचे बुजुर्ग प्रख्यात कवी व शाहीर गोंविद केशव शिंदे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंञी ना. आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, सभापती नीलिमा पाटील, बाळ कल्याण सभापती गीताताई जाधव, तसेच जि.प.चे पदाधिकारी उपस्थित होते. गोविंद शिंदे हे एक उत्कृष्ठ कवी व शायर असुन त्यांच्या लेखणीतून अनेक विषयांवर काव्य प्रसिध्द आहेत. बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे काव्य तर ते अप्रतिम लिहितात तसेच समाज प्रबोधन, गौरी गणपतीचे गाणे, अधुनिक आध्यात्मिक गौळणी, कोरोना काळात जनतेला गर्दी पासुन अलिप्त रहा असे सांगणारी गीते ही गोंविद शिंदे यांनी लिहिली असून एक मनाला स्पर्श करणारी आहेत. या त्यांच्या गाण्याची दख्खल रायगडच्या प्रशासनाने घेऊन या रायगडच्या लाडक्या कलावंताला या वर्षीचा रायगड भुषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले असून गोंविद शिदें यांना रायगड भुषण हा पुरस्कार मिळताच इंदापुर विभागातील बहुजन जनतेतुन तसेच त्याच्या मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment